भूविज्ञान मंत्रालय

सौराष्ट्र, कच्छ, कोकण आणि गोव्यात 25 ते 27 मार्च तसेच उत्तर गुजरातमध्ये 27 ते 28 मार्च दरम्यान काही तुरळक भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता

Posted On: 26 MAR 2021 5:52PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 26 मार्च 2021

हवामान विभागाच्या राष्ट्रीय हवामान अंदाज केंद्राने वर्तवलेला अंदाज :

ठळक वैशिष्ट्ये :

  • वेस्टर्न डिस्टर्बनस आणि त्यामुळे  निर्माण झालेल्या चक्रवाती हवेमुळे पश्चिमी हिमालय प्रदेश आणि पंजाब या भागात 22 ते 24 मार्च 2021 या काळात विस्तृत परिसरात पाऊस/बर्फवृष्टी/वादळे निर्माण झाली. तसेच यामुळे, ईशान्य भारत आणि मध्य भारतातही या काळात वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याचे आढळले आहे. राजस्थानातही या दोन दिवसात तुरळक ठिकाणी गारपीट/वारावादळ झाल्याचे वृत्त आहे.
  • देशाच्या मध्यभागात निर्माण झेल्या चक्रीवातांमुळे मध्य भारतात गेल्या आठवड्यात (18 ते 24 मार्च, 2021)अनेक भागांमध्ये हलका किंवा मध्यम स्वरूपाचा पाऊस/ तुरळक पाऊस/वादळीवाऱ्यासह पाऊस झाल्याचे आढळले.
  • खाली आग्नेय दिशेला बंगालच्या उपसागरातून वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे ईशान्य भारतात  येत्या 29 मार्च ते 3 एप्रिल दरम्यान, मोठ्या पट्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या काळात, या प्रदेशातील काही भागात पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे.
  • याच दरम्यान म्हणजे 25 ते 27 मार्च या काळात, सौराष्ट्र आणि कच्छ तसेच कोकण आणि गोवा या भागात उष्णतेची लाट येण्याची शक्यता असून, उत्तर गुजरात भागात 27 आणि 28 मार्च 2021 ला उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे.

पुढच्या दोन आठवड्यांसाठीचा हवामानाचा अंदाज

पहिला आठवडा(25 ते 31 मार्च, 2021)आणि दुसरा आठवडा ( 1 ते  07 एप्रिल, 2021)

हवामानाची स्थिती  आणि संबधित पर्जन्यमान

(ग्राफिक्स मध्ये सविस्तर बघण्यासाठी येथे क्लिक करा)

व्हिडीओ मध्ये बघण्यासाठी:

गेल्या आठवड्यातील हवामानाचे वृत्त आणि पुढच्या दोन आठवड्यांचा हवामानाचा अंदाज (इंग्रजीतून) 25.03.2021:*

Facebook link:

https://www.facebook.com/India.Meteorological.Department/videos/487864918910276

Weather Review for past one week and Weather Forecast for next two weeks (Hindi) Dated 25.03.2021*

Facebook link:

https://www.facebook.com/India.Meteorological.Department/videos/458554935263012

Kindly download MAUSAM APP for location specific forecast & warning, MEGHDOOT APP for Agromet advisory and DAMINI APP for Lightning Warning & visit state MC/RMC websites for district wise warning.

 

Jaydevi PS/R.Aghor/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1707878) Visitor Counter : 14


Read this release in: English , Hindi , Bengali , Manipuri