आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

“जेव्हा भारत निश्चय करतो, तेव्हा भारत ते करतोच” जागतिक क्षयरोग दिवसानिमित्त कार्यक्रमात उद्घाटन करतांना केंद्रीय मंत्री डॉ हर्ष वर्धन यांचे उद्गार


जागतिक क्षयरोग दिनानिमित आरोग्यमंत्र्यांची ‘क्षयरोग मुक्त भारताची” घोषणा; क्षयरोग निर्मूलन जनचळवळ बनवून 2025 पर्यंत क्षयरोगाचे समूळ उच्चाटन करण्याचे डॉ हर्ष वर्धन यांचे आवाहन

लक्षद्वीप आणि जम्मू काश्मीरचा बडगाम जिल्हा देशातील पहिले क्षयमुक्त प्रदेश म्हणून घोषित

Posted On: 24 MAR 2021 10:35PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 24 मार्च 2021


केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री डॉ हर्षवर्धन यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत ‘जागतिक क्षयरोग दिना’ निमित्त आयोजित विशेष कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. यावेळी आरोग्य राज्य मंत्री अश्विनी कुमार चौबे देखील उपस्थित होते.

WhatsApp Image 2021-03-24 at 6.44.28 PM.jpeg

“भारतात, आज जगातील एकूण क्षयरोग्यांपैकी 30 टक्के रुग्ण आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारने वर्ष 2025 पर्यंत क्षयरोगाचे समूळ उच्चाटन करण्याचे उद्दिष्ट ठेवले असून क्षयरोग निर्मूलनाला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे”, असे हर्ष वर्धन यांनी यावेळी बोलतांना सांगितले. यादृष्टीने सरकारने क्षयरोगाच्या निर्मूलनासाठी गेल्या पाच वर्षात अर्थसंकल्पीय तरतुदीत मोठी वाढ करण्यात आली आहे, असेही ते म्हणाले. उच्च दर्जाची औषधे, डिजिटल तंत्रज्ञान, खाजगी क्षेत्रांचा आणि नागरी समुदायांचा सहभाग वाढवणे, आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून टीबीची औषधे आणि इतर सेवा तळागाळापर्यंत पोचवणे या सर्व गोष्टींची प्राधान्याने अंमलबजावणी होत असल्याने, भारतात क्षयरोग्यांचे प्रमाण झपाट्याने कमी होत असून, मृत्यूदरही घटला आहे, असे हर्ष वर्धन म्हणाले.

WhatsApp Image 2021-03-24 at 6.44.28 PM (1).jpeg

यावेळी क्षयरोगाचे प्रमाण कमी करण्यात यशस्वी ठरलेल्या राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांचा गौरव करण्यात आला. लक्षद्वीप आणि जम्मू कश्मीरमधील बडगाम जिल्हा क्षयरोगमुक्त झाल्याचे यावेळी जाहीर करण्यात आले.

वर्ष 2020 मध्ये कोविड-19 चा प्रकोप असतांनाही भारतातील क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत 18.04लाखांपेक्षा जास्त नोंदणी झाली, असेही त्यांनी सांगितले. 2025 पर्यंत टीबीचे समूळ उच्चाटन करण्याचे उद्दिष्ट साध्य केले जाईल असा विश्वास व्यक्त करत, “भारत जो निश्चय करतो, तो पूर्णही करतो” असे डॉ हर्ष वर्धन यावेळी म्हणाले. देशभरात, कोविड आणि क्षयरोग दोन्हीची चाचणी करण्यासाठी भारतीय बनावटीचे स्वस्त आणि सुलभ निदान मशीन – TrueNAT  विकसित करण्यात आले असून ते अनेक ठिकाणी वितरीत करण्यात आले आहे, असेही त्यांनी सांगितले.

WhatsApp Image 2021-03-24 at 6.44.29 PM.jpeg

या दिवसानिमित्त डॉ हर्षवर्धन यांनी ‘क्षयरोग मुक्त भारताच्या संकल्पाची घोषणा करत, क्षयरोगमुक्ती ही जनचळवळ बनवण्याचे आवाहन जनतेला केले.


* * *

S.Tupe/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1707385) Visitor Counter : 1682


Read this release in: English , Urdu , Hindi