जलशक्ती मंत्रालय
जलसंपदा क्षेत्रात भारत आणि जपान दरम्यान स्वाक्षरी झालेल्या सहकार्याच्या सामंजस्य करारास केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता
प्रविष्टि तिथि:
23 MAR 2021 4:28PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 23 मार्च 2021
भारत सरकारच्या जलशक्ती मंत्रालयाचा जलसंपदा, नदी विकास आणि गंगा पुनरुज्जीवन विभाग आणि जपानच्या जमीन, पायाभूत सुविधा, परिवहन आणि पर्यटन मंत्रालयाच्या जल व आपत्ती व्यवस्थापन ब्युरो दरम्यान स्वाक्षरी झालेल्या सहकार्याच्या सामंजस्य करारास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने आज मान्यता दिली.
फायदे:-
माहिती, ज्ञान, तंत्रज्ञान आणि वैज्ञानिक सदृश्य अनुभवाची देवाण-घेवाण वाढविण्यासाठी तसेच उभय देशांदरम्यान संयुक्त प्रकल्पांच्या अंमलबजावणीकरिता जल आणि त्रिभुज प्रदेश व्यवस्थापन आणि जल तंत्रज्ञान क्षेत्रात दीर्घकालीन सहकार्याच्या विकासासाठी या सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली.
जल सुरक्षा, सुधारित सिंचन सुविधा आणि जलसंपदा विकासात शाश्वतता मिळविण्यात हा सामंजस्य करार मदत करेल.
S.Tupe /V.Joshi/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1706941)
आगंतुक पटल : 235
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें:
English