संरक्षण मंत्रालय
ऑपरेशन थिरवल्लूर: नागरिकांच्या सुरक्षेसाठी लष्कराची मोहीम
Posted On:
22 MAR 2021 8:45PM by PIB Mumbai
पुणे येथील दक्षिण कमांड, सैनिकांनी नागरिकांच्या सुरक्षेसाठी "ऑपरेशन थिरवल्लूर" सुरु केले आहे.

लष्कराकडून नागरी प्रशासनाला मदत करण्याच्या हेतूने ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत, तामिळनाडू मधील थिरवल्लूर जिल्ह्यातील गुम्मीडीपुंडी येथील राज्य औद्योगिक विकास महामंडळ तामिळनाडू मर्यादित च्या औद्योगिक वसाहतीतील क्षेत्रात जुन्या कारखान्यातून कदाचित अनावधानाने गोळा केलेलया, स्फोट न झालेल्या 10 टन दारूगोळ्यांची सुरक्षितरित्या विल्हेवाट लावण्यात आली. नागरी अधिक-यांबरोबर तपशीलवार नियोजन आणि सहकार्यातून गेल्या अनेक आठवड्यांपासून क्लिष्ट आणि गुंतागुंतीचा हा प्रत्यत्न सुरु असून ही एक उत्कृष्ट मोहीम आहे. लष्कर आणि तामिळनाडू राज्य सरकार यांच्या संयुक्त समन्वय आणि नियोजनाच्या माध्यमातून हे करण्यात आले, त्यांच्या विनंतीवरून संरक्षण मंत्रालयाने या मोहिमेला विशेष मान्यता दिली.

गुम्मीडीपुंडी आणि आसपासच्या परिसरातील सर्व नागरिकांसाठी सुरक्षित वातावरण सुनिश्चित करणे, हे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे. या मोहिमेअंतर्गत, धातूचे भंगार असलेल्या दारुगोळ्याच्या कोठारातून सापडलेल्या, स्फोट झाला नसलेल्या आयुधांचे वर्गीकरण करून आणि त्याची विल्हेवाट लावल्यानंतर ,ती आता जमिनीखाली पुरण्यात आली. काही वर्षांपूर्वी झालेल्या हिंसक स्फोटात एका कारखान्यातील कामगाराचा मृत्यू झाल्यानंतर हे दारुगोळ्याचे कोठार उघडकीला आले होते. ही मोहीम आणखी काही दिवस सुरु राहण्याची शक्यता आहे.


**
M.Iyengar/S.Chavan/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1706738)
Visitor Counter : 188