संरक्षण मंत्रालय

भारतीय लष्कराला लाइट स्पेशालिस्ट व्हेइकल पुरवण्यासाठी संरक्षण मंत्रालयाचा एमडीएसएलसोबत करार

Posted On: 22 MAR 2021 5:11PM by PIB Mumbai

 

मेक इन इंडियाला आणखी चालना देण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने, 1,056 कोटी रुपये खर्चाची 1,300 लाइट स्पेशालिस्ट व्हेइकल भारतीय लष्कराला पुरवण्यासाठी महिंद्रा डिफेंन्स सिस्टिम्स लिमिटेडसोबत (एमडीएसएल)  सोबत आज 22 मार्च 2021 रोजी नवी दिल्ली येथे करार केला. या वाहनांचा लष्करात समावेश चार वर्षात पूर्ण करण्याचे नियोजन आहे.

लाइट स्पेशलिस्ट व्हेइकल हे एक आधुनिक लढाऊ वाहन आहे आणि मध्यम मशीन गन्स, स्वयंचलित ग्रेनेड लॉन्चर्स तसेच रणगाडा प्रतिरोधक निर्देशित क्षेपणास्त्रांच्या वहनासाठी विविध लढाऊ एककांसह सज्ज केले जाईल.

लाइट स्पेशलिस्ट वाहनाचे आरेखन स्वदेशी असून ते  एमडीएसएलने विकसित केले आहे. ही लढाऊ वाहने छोट्या शस्त्रास्त्रांच्या आगीपासून संरक्षण करण्यासोबतच  अत्यंत वेगाने आणि सहज हालचाल करू शकणारी  आहेत. तसेच शस्त्रास्त्र मंचासह परिचालन करणे आवश्यक असलेल्या परिचालन क्षेत्रात ती छोट्या स्वतंत्र तुकड्यांना मदत करतील.

संरक्षण उद्योगातील स्वदेशी उत्पादन क्षमता दर्शविणारा हा प्रमुख प्रकल्प असून सरकारच्या आत्मनिर्भर भारत अभियानआणि मेक इन इंडियाउपक्रमात आणखी एक मैलाचा दगड ठरेल.

https://static.pib.gov.in/WriteReadData/userfiles/image/PIC1OXGB.JPG

 

S.Tupe/S.Kakade/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1706648) Visitor Counter : 295


Read this release in: English , Urdu , Hindi