पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय
द्रव नैसर्गिक वायुचा पुरवठा
Posted On:
22 MAR 2021 3:58PM by PIB Mumbai
सरकारने सध्या देशांर्तगत गॅस पुरवठ्यात, नगर गॅस वितरणला (सीजीडी), घरगुती वापर (स्वयंपाकासाठी - पीएनजी डोमेस्टिक ) आणि परिवहन (सीएनजी ) क्षेत्रासाठी सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. सीजीडी नेटवर्कचे औद्योगिक आणि वाणिज्यिक वापरकर्तेसुद्धा त्यांच्याशी संबंधित तांत्रिक वाणिज्यिक गरजांनुसार बाजार निर्धारित मूल्यावर एलएनजीसहित गॅसचा वापर करू शकतात.
पाईपलाईनद्वारे नैसर्गिक वायूची वाहतूक करणे आर्थिकदृष्ट्या सुलभ आणि वाहतुकीची सुरक्षित पध्दत आहे. तसेच तंत्रज्ञानाचा वापर करण्यासह आवश्यक सुरक्षा उपाययोजना कार्यान्वयन संस्थेने करायच्या आहेत.
केंद्रीय पेट्रोलियम व नैसर्गिक वायू मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आज लोकसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.
S.Tupe/S.Kakade/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1706617)
Visitor Counter : 233