वस्त्रोद्योग मंत्रालय

कापूस उद्योगावर कोविड -19 चा परिणाम

Posted On: 19 MAR 2021 4:05PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 19 मार्च 2021

वस्त्रोद्योग मंत्रालयाने कापूस वस्त्रोद्योगासह कापड उद्योगात तरलतेला समर्थन देण्यासाठी विशेष उपाययोजना केली आहे ज्यात अनुदान जाहीर करण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी बँक हमी (बीजी) ऐवजी आंशिक अनुदान देण्याचा पर्याय उपलब्ध करुन दिला आहे. सुधारित तंत्रज्ञान अद्यतनित निधी योजनेंतर्गत (एटीयूएफएस) 100.36 कोटी रुपयांच्या एकूण 400 युनिट्सना आणि सुधारित पुनर्रचना -तंत्रज्ञान अद्यतनित निधी योजनेंतर्गत 42.52 कोटी रुपयांच्या 20 युनिट्सना समर्थन आहे. सन 2020-21 (एप्रिल-जाने 2021) साठी कापसाच्या धाग्याचे अंदाजे महिन्यानुसार उत्पादन जोडपत्रात दिले आहे.

 आंतरराष्ट्रीय कापूस दराच्या तुलनेत सध्याच्या कापूस हंगामात कापसाची सरासरी देशांतर्गत किंमत सुमारे 14 टक्क्यांनी स्वस्त आहे. भारत हा जगातील सर्वात मोठा कापूस निर्यातदार देश आहे. चीन, व्हिएतनाम, बांगलादेश हे कापूस निर्यातदार देश नसून कापूस आयातदार देश आहेत.

 फॅब्रिक फॉरवर्ड पॉलिसी उपक्रमांतर्गत वार्षिक स्रोत योजना राबविण्यासाठी, भारत, बांगलादेश वस्त्रोद्योग मंच (आयबीटीआयएफ) संस्थागत केला गेला आहे.

 केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री स्मृती झुबिन इराणी यांनी आज लोकसभेमध्ये लेखी उत्तरात ही माहिती दिली.

Annexure

Monthwise estimated production of Cotton Yarn(Provisional)

(April 2020 to January 2021) 

                                                                          (Figures in million)

Month

Production (in Million Kg)

April 2020

229.60

May 2020

251.41

June 2020

280.57

July  2020

285.08

August 2020

290.94

September 2020

313.73

October 2020

337.63

November 2020

316.79

December 2020

321.09

January 2021

318.42

 

M.Chopade/V.Joshi/P.Malandkar

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1706223) Visitor Counter : 148
Read this release in: English , Urdu