संरक्षण मंत्रालय

दक्षिण कमांडमधील बहुसंख्य कोविडयोद्ध्ये आणि आघाडीवरील कर्मचाऱ्यांचे लसीकरण

प्रविष्टि तिथि: 18 MAR 2021 8:33PM by PIB Mumbai

पुणे, 18 मार्च 2021

 

राष्ट्रीय कोविड 19  लसीकरण मोहीम आणि केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, 08 फेब्रुवारी  2021 रोजी  11  राज्ये आणि 04  केंद्रशासित प्रदेशांचा समावेश असलेल्या दक्षिण कमांड क्षेत्रात कर्तव्यावर असलेल्या  आघाडीवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे लसीकरण सुरु करण्यात आले.  संपूर्ण दक्षिण कमांडमधील लष्करी रुग्णालयात एकूण 47 विशेष लसीकरण केंद्रे स्थापण्यात आली असून  लसीकरण कार्यक्रमाअंतर्गत निश्चित करण्यात आलेले दैनंदिन उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी लष्कराचे वरिष्ठ कार्यकारी वैद्यकीय अधिकारी आणि त्यांच्या  पथकांनी  अथक परिश्रम घेतले. आजपर्यंत, भारत सरकारच्या निर्देशानुसार, आरोग्य आणि आघाडीवर राहून काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मोठ्या प्रमाणात लसीकरण झाले आहे.

     

दक्षिण कमांड क्षेत्रात कर्तव्यावर असलेले  आघाडीवर राहून काम कर्मचाऱ्यांची  लसीकरण मोहीम सुलभपणे पार पाडली जावी , हे सुनिश्चित करण्यासाठी आणि सक्रिय पाठिंब्याने लसीकरण मोहिमेला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीनं  राज्य आणि जिल्हा लसीकरण अधिकाऱ्यांशी जवळचा संपर्क प्रस्थापित करण्यासाठी  लष्काराच्या वैद्यकीय सेवेतील नोडल अधिकाऱ्यांची महत्वपूर्ण भूमिका आहे. 

     

दक्षिण कमांडमधील  लष्करी रुग्णालयात कोविन मंचाच्या माध्यमातून, कोरोना विषाणू प्रतिबंधक मोहिमेअंतर्गत, 60 वर्षांवरील व्यक्तींसह सेवानिवृत्त लष्करी कर्मचारी, लष्करात सध्या कार्यरत असलेल्यांवर अवलंबून   45 ते  59 वयोगटातील सह्व्याधी असलेल्या व्यक्ती यांचेही लसीकरण सुरु आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, "आम्ही आमच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांची आणि त्यांच्या कुटुंबीयांची काळजी घेण्यासाठी वचनबद्ध आहोत आणि त्यांचे लसीकरण सुरळीत व्हावे यासाठी एक विशेष मोहीम राबविली जात आहे”.


* * *

M.Iyengar/S.Chavan/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1705893) आगंतुक पटल : 114
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English