माहिती आणि प्रसारण मंत्रालय

'आझादी का अमृत महोत्सव’चे उद्दिष्ट नवीन भारताची निर्मिती करणे आहे -मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत


15 मार्च पर्यंत आझाद मैदानावर भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे विविध पैलू पहा

Posted On: 12 MAR 2021 9:50PM by PIB Mumbai

गोवा, 12 मार्च 2021

 

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज ‘आझादी का अमृत महोत्सव’ चा प्रारंभ केला आणि स्वातंत्र्याच्या 75 वर्षांच्या निमित्ताने आझाद मैदान, पणजी येथे लोक संपर्क विभागाच्या छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन केले.

आपल्या देशाच्या महान इतिहासाचे स्मरण करून नवभारताची निर्मिती करणे हे "आझादी का अमृतमहोत्सव"चे उद्दिष्ट असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. ते म्हणाले की इतिहासाचे स्मरण  केल्याशिवाय कोणताही देश प्रगती करू शकत नाही.

या कार्यक्रमाच्या माध्यमातून नवीन पिढी  नवीन भारत घडवण्यासाठी इतिहासापासून प्रेरणा घेईल. आज भारत सर्व क्षेत्रात प्रगती करत आहे आणि ‘विश्वगुरु’ होण्याच्या मार्गावर आहे, असे डॉ सावंत म्हणाले. कोविडच्या  कठीण काळात भारताने जगाला उदारपणे मदत केली, जे जागतिक संदर्भात भारताचे उज्ज्वल भविष्य दर्शवते.

लोक संपर्क विभाग, गोवा यांनी आयोजित केलेल्या स्वातंत्र्य लढ्यावरील  छायाचित्र प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले. गोवा मुक्तीची 60 वर्षे आणि भारत @75 साजरे करणे हा गोव्यासाठी अभिमानाचा क्षण आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले. हे छायाचित्र प्रदर्शन सर्वांसाठी विनामूल्य आहे.

तत्पूर्वी मुख्यमंत्र्यांनी आझाद मैदान येथील शहीद स्मारकात पुष्पांजली वाहिली. सायकल रॅलीला हिरवा झेंडा दाखवून  कार्यक्रमाची सांगता झाली.


* * *

M.Chopade/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1704497) Visitor Counter : 127


Read this release in: English