गृह मंत्रालय
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी सोहळ्याचा प्रारंभ केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी केले अभिनंदन
Posted On:
12 MAR 2021 8:30PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 12 मार्च 2021
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी सोहळ्याचा प्रारंभ केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे केंद्रीय गृह मंत्री अमित शहा यांनी अभिनंदन केले आहे.
1930 मध्ये गांधीजींच्या दांडी यात्रेने स्वातंत्र्य लढ्याला स्फुरण दिले,आज 2021 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली निघालेल्या या पद यात्रेमुळे आत्मनिर्भर भारताच्या निर्धाराला नवी ऊर्जा प्राप्त होईल असे अमित शहा यांनी ट्वीट संदेशांच्या मालिकेत म्हटले आहे. गांधीजींच्या स्वदेशी चळवळीत आत्मनिर्भर भारताच्या निर्धाराची पूर्तता सामावली होती तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्होकल फॉर लोकल या हाकेतही हेच प्रतिबिंबित होत असल्याचे शहा यांनी म्हटले आहे. भविष्यकाळ हा भारताचा आहे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वारंवार सांगितले आहे, मात्र आपण आपल्या कर्तव्यांची पूर्तता करत आत्मनिर्भर भारताच्या दिशेने काम करू तेव्हाच हे शक्य होईल. आपली संस्कृती, मुल्ये यांच्याशी आपल्याला सांधण्यामध्ये स्वदेशी उत्पादने, विशेषतः खादीची महत्वाची भूमिका आहे असा मला विश्वास आहे असे अमित शहा यांनी म्हटले आहे.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर ‘मेड इन इंडिया’ अर्थात भारतात उत्पादित वस्तू खरेदी करून प्रत्येक क्षेत्रात भारताला स्वयंपूर्ण करण्याचा निर्धार करूया असे शहा यांनी म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्होकल फॉर लोकल साठी पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत जवळच्या खादी भांडारातून आपण वस्त्र आणि डायरी खरेदी केल्याचे गृह मंत्र्यांनी सांगितले. पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत नागरिकांनी स्वदेशी उत्पादन खरेदी करून #VocalforLocal सह सोशल मीडियावर शेअर करण्याचे आवाहन त्यांनी केले.
* * *
M.Chopade/N.Chitale/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1704469)
Visitor Counter : 245