रेल्वे मंत्रालय

रेल्वे स्थानकांवर जागतिक तोडीच्या सुविधा

Posted On: 10 MAR 2021 7:08PM by PIB Mumbai

 

रेल्वे मंत्रालयाने स्थानक पुनर्विकास योजने अंतर्गतरेल्वे स्थानकांवरच्या सुविधात सुधारणा आणि वृद्धी करण्याचे नियोजन केल्याची माहिती रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनी आज लोकसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात दिली. या योजने अंतर्गत स्थानक इमारतीत प्रवाश्यांची कोंडी न होता ये-जा, आगमन झालेले आणि निघालेले असे  प्रवाश्यांचे विभाजन, शहराच्या दोन्ही बाजू जोडणे, बस,मेट्रो यासारख्या इतर वाहतूक व्यवस्थेशी सांगड, प्रवासी स्नेही  आंतरराष्ट्रीय चिन्हे, प्रवाश्यांना सोडण्यासाठी आणि नेण्यासाठी तसेच पार्किंगसाठी पुरेशी तरतूद यांचा यात समावेश आहे.

महाराष्ट्रातल्या नागपूर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि अजनी स्थानकांवर पुनर्विकासाचे काम हाती घेण्यात आले आहे.अशा प्रकारचा  स्थानक पुनर्विकास कार्यक्रम प्रथमच हाती घेण्यात आला आहे. हे काम गुंतागुंतीच्या स्वरूपाचे असून तपशीलवार तांत्रिक-वित्तीय व्यवहार्यता अभ्यासाची आणि शहरी, स्थानिक संस्थांकडून विविध वैधानिक मंजुऱ्यांची यासाठी आवश्यकता आहे. त्यामुळे  या क्षणाला यासाठी कालमर्यादा दर्शवण्यात आलेली नाही असे या उत्तरात म्हटले आहे. 

***

M.Chopade/N.Chitale/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1703930) Visitor Counter : 95


Read this release in: English , Urdu