सामाजिक न्याय आणि सबलीकरण मंत्रालय

भटक्या जमातींसमोर असलेली आव्हाने

प्रविष्टि तिथि: 10 MAR 2021 6:22PM by PIB Mumbai

 

भटक्या जमाती आणि अर्ध-भटक्या जमाती म्हणजे समाजातील असे घटक आहेत जे त्यांच्या चरितार्थासाठी बदलत्या मोसमानुसार सतत भटकंती करत असतात आणि त्यामुळे त्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जात राहावे लागते.

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने 21 फेब्रुवारी 2021ला जारी केलेल्या सरकारी राजपत्रातील निर्णयानुसार, बिगर-सूचित, भटक्या आणि अर्ध-भटक्या जमातींमधील नागरिकांचा विकास आणि कल्याण साधण्याच्या उद्देशाने बिगर-सूचित, भटक्या आणि अर्ध-भटक्या जमाती विकास आणि कल्याण मंडळाची स्थापना केली आहे. ह्या मंडळाचा कार्यकाळ 3 वर्षांचा असून त्याचा कालावधी 5 वर्षांपर्यंत वाढविता येतो.

या मंडळाकडे खालील जबाबदाऱ्या दिल्या आहेत:

  • बिगर-सूचित, भटक्या आणि अर्ध-भटक्या जमातींमधील नागरिकांसाठी आवश्यकतेनुसार विकासाच्या आणि कल्याणकारी योजना तयार करून त्यांची अंमलबजावणी करणे
  • या जमाती जिथे मोठ्या प्रमाणावर आढळतात असे प्रदेश आणि जागा निश्चित करणे.
  • बिगर-सूचित, भटक्या आणि अर्ध-भटक्या जमातींमधील नागरिकांसाठी सध्या राबविले जाणारे सरकारी कार्यक्रम आणि त्यांचे अधिकृत हक्क यांच्यातील तफावती ओळखून त्यांचे मूल्यमापन करणे आणि सरकारची संबंधित मंत्रालये आणि योजना राबविणाऱ्या संस्था यांच्याशी समन्वय साधून सध्याच्या योजनांमधून या जमातींमधील नागरिकांच्या विशेष गरजा पुरविल्या जातील याची खात्री करून घेणे.
  • बिगर-सूचित, भटक्या आणि अर्ध-भटक्या जमातींमधील नागरिकांसाठी केंद्र सरकार आणि राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशांची सरकारे राबवीत असलेल्या योजनांच्या प्रगतीचे बारकाईने परीक्षण आणि मूल्यमापन करणे

बिगर-सूचित, भटक्या आणि अर्ध-भटक्या जमातींमधील नागरिकांच्या शैक्षणिक उत्थानासाठी राज्य तसेच केंद्रशासित प्रदेशांमधील अंमलबजावणी संस्थांच्या माध्यमातून या जमातींमधील विद्यार्थ्यांकरिता सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण विभाग केंद्र पुरस्कृत डॉ. आंबेडकर दहावी-पूर्व आणि दहावी-पश्चात शिष्यवृत्ती योजना राबवीत आहे. यातील दहावी-पूर्व शिष्यवृत्ती योजना या जमातींमधील विद्यार्थ्यांमध्ये विशेषतः मुलींमध्ये शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी उपयुक्त ठरत आहे.

सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण राज्यमंत्री कृष्ण पाल गुर्जर यांनी आज राज्यसभेत लिखित उत्तराद्वारे ही माहिती दिली.

 

M.Chopade/S.Chitnis/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1703897) आगंतुक पटल : 336
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu