पर्यावरण, वन एवं जलवायु परिवर्तन मंत्रालय
आंतरराष्ट्रीय महिला दिनी पर्यावरण मंत्र्यांकडून महिला वनाधिकांऱ्यांवरील ई-पुस्तकाचे विमोचन
महिला अधिकारी आणि कर्मचारी कौशल्यासोबतच करुणा, प्रामाणिकपणा आणि समर्पण भावनेने सेवा बजावतात : प्रकाश जावडेकर
Posted On:
08 MAR 2021 10:05PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 मार्च 2021
वन सेवेतील दोनशे पन्नासहून जास्त महिला ऑफिसर आणि पाच हजार आघाडीवरील महिला कर्मचारी यांच्या पहिल्याच परिषदेत केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी महिला वनाधिकाऱ्यांची तसेच आघाडीवरच्या महिला कर्मचाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत असल्याबद्दल संतोष व्यक्त केला. स्त्री अधिकारी तसेच स्त्री कर्मचारी त्यांच्याकडील गुणवत्ता आणि आवश्यक कौशल्य यांच्याशिवाय परिणामकारक संवाद, प्रामाणिकपणा आणि कामाप्रती समर्पण या नैसर्गिक गुंणांचा वापर करत असल्यामुळे कामासाठी मोठी शक्ती उपलब्ध होते असे उद्गार जावडेकर यांनी काढले.
या वेळी जावडेकर यांनी व्हर्च्युअल कार्यक्रमात “ग्रीन क्वीन्स ऑफ इंडिया : अ नेशन्स प्राईड“ या ई-पुस्तकाचे विमोचन केले. महिला व अन्य महिला कर्मचाऱ्यांच्या केस स्टडीज त्यांचे अनुभव आणि उत्कृष्ट कार्य याबद्दल त्यांनी व्यक्त केलेल्या गोष्टींचे हे संकलन असून याला सर्वसामान्य सर्जक मूल्य आहे.
हे ई-पुस्तक वनसेवेतील तरुण महिला कर्मचाऱ्यांना तसेच जंगलात वनाधिकारी म्हणून वास्तव्य करण्याची आणि काम करण्याची इच्छा असणाऱ्या देशभरातील सर्व तरुण स्त्रियांसाठी प्रोत्साहनपर असे ठरेल अशी खात्री जावडेकर यांनी यावेळी व्यक्त केली
ई-पुस्तक “ग्रीन क्वीन्स ऑफ इंडिया : अ नेशन्स प्राईड”
M.Chopade/V.Sahjrao/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1703353)
Visitor Counter : 317