सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय

उद्यम नोंदणी आता अधिक सोपी


उद्यम पोर्टलने 25 लाख नोंदणीचा टप्पा ओलांडला

Posted On: 08 MAR 2021 7:31PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 8 मार्च 2021

नवीन उद्यम नोंदणी पोर्टल (https://udyamregistration.gov.in/) ला हितधारकांकडून  उत्साहपूर्ण प्रतिसाद मिळत आहे.  पोर्टलवर नोंदणी करण्याची आवश्यकता सरकारने आणखी सोपी  केली आहे. एक पानी नोंदणी, कमी वेळ हे पोर्टलचे उद्दिष्ट आहे.

दि. 26.06.2020 रोजीच्या अधिसूचनेत दिलेली व्याख्या व तपशील यामध्ये , उद्यम नोंदणी पोर्टलवर नोंदणीसाठी अनिवार्य अटींमध्ये जीएसटीआयएन एक अट असल्याचे नमूद केले असून  01.04.2021 पासून लागू करण्यात आले आहे. मात्र  जीएसटीआयएन अनिवार्य करण्याच्या निर्णयामुळे नोंदणी प्रक्रियेवर परिणाम होत आहे, असे निवेदन  एमएसएमई असोसिएशनने दिले आहे. कारण जीएसटी  कायदा/अधिसूचनेनुसार जीएसटी विवरणपत्रं भरण्याच्या अनिवार्य आवश्यकतेतून  अनेक उद्योजकांना सूट देण्यात आली आहे.

तसेच उद्यम नोंदणी पोर्टलला सुलभता आणि पारदर्शकतेमुळे उत्तम प्रतिसाद  मिळाला आहे.  उपभोक्ता मैत्रीशिवाय या साधेपणा, वस्तुनिष्ठता आणि पारदर्शकता याविषयी भागधारकांकडून मोठा प्रतिसाद मिळाला आहे. 5.3.2021 (सायंकाळी 6.53) पर्यंत उद्यम नोंदणी पोर्टलने 25,20,341 इतका  नोंदणी टप्पा गाठला आहे.

या सुविधेमुळे कुशल कारागीर आणि कलाकार यांच्यासह विविध सूक्ष्म उद्योगांना आणि अनौपचारिक क्षेत्रातील /असंघटित क्षेत्रातील इतर उद्योगांना नोंदणी सहजतेने पार पाडण्यास मदत होईल. उद्योजक उद्यम नोंदणी पोर्टलमध्ये नोंदणीसाठी पॅनचा वापर करु शकतात.

 

 

 

M.Chopade/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1703342) Visitor Counter : 252


Read this release in: English , Urdu , Hindi