कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्रालय
देशभरात महिला उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने सुरू केलेले कार्यक्रम
Posted On:
08 MAR 2021 8:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 8 मार्च 2021
कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय (एमएसडीई) उद्योजकता शिक्षण, प्रशिक्षण, समर्थन आणि उद्योजकता नेटवर्कमध्ये सहज प्रवेश मिळवून देऊन सक्षम परिसंस्था तयार करण्यासाठी प्रधानमंत्री युवा योजना (पीएम युवा ) योजना राबवत आहे. या योजनेत 10 राज्ये आणि 2 केंद्रशासित प्रदेश (उदा. उत्तर प्रदेश, उत्तराखंड, बिहार, पश्चिम बंगाल, आसाम, मेघालय, महाराष्ट्र, तामिळनाडू, तेलंगणा, केरळ, दिल्ली आणि पुदुचेरी). यांचा समावेश आहे. परिशिष्ट-I १ मधील तपशिलानुसार उद्योजकता विकास कार्यक्रम (ईडीपी) आणि मार्गदर्शन शिबिरे अंतर्गत लाभार्थी (पुरुष व महिला स्वतंत्रपणे) ची राज्यनिहाय माहिती दिली आहे.
यात महाराष्ट्रातील 1533 लाभार्थींचा समावेश असून यात 1038 पुरुष आणि 495 महिला आहेत
कौशल्य विकास आणि उद्योजकता राज्यमंत्री राज कुमार सिंह यांनी आज राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली
M.Chopade/S.Kane/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1703317)
Visitor Counter : 143