केंद्रीय लोकसेवा आयोग

राष्ट्रीय संरक्षण अकादमी आणि नौदल अकादमीच्या वर्ष 2020 च्या प्रथम परीक्षेचे अंतिम निकाल जाहीर

प्रविष्टि तिथि: 06 MAR 2021 6:04PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 6 मार्च 2021

 

राष्ट्रीय संरक्षण अकादमीच्या 145 व्या वर्ष अभ्यासक्रमातील भूदल, नौदल आणि हवाई दल विभागांतील तसेच भारतीय नौदल अकादमीच्या 107 व्या  अभ्यासक्रमातील प्रवेशासाठी केंद्रीय लोकसेवा आयोगाने 6 सप्टेंबर 2020 ला घेतलेल्या लेखी परीक्षेतील गुण आणि त्यानंतर संरक्षण मंत्रालयाच्या सेवा निवड मंडळाने घेतलेल्या मुलाखतींच्या आधारे पात्र ठरलेल्या 533 उमेदवारांची यादी खाली जोडली आहे. या अभ्यासक्रमांचे वर्ग सुरु होण्याच्या तारखांच्या तपशीलवार माहितीसाठी संरक्षण मंत्रालयाच्या www.joinindianarmy.nic.in,  www.joinindiannavy.gov.in  आणि  www.careerindianairforce.cdac.in. या संकेतस्थळांना भेट द्यावी.

या परीक्षांचे निकाल केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या https://www.upsc.gov.in. या संकेतस्थळावर देखील उपलब्ध आहेत.

अधिक माहितीसाठी उमेदवारांनी मंडळाच्या ‘C’ गेट जवळील सुविधा केंद्राला प्रत्यक्ष भेट द्यावी अथवा 011-23385271/011-23381125/011-23098543 या टेलीफोन क्रमांकांवर कोणत्याही कामकाजाच्या दिवशी सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत संपर्क साधावा.

अंतिम निकालांसाठी येथे क्लिक करा :

 

S.Tupe/S.Chitnis/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1702905) आगंतुक पटल : 331
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी , Tamil