आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय

कोविड19 प्रतिबंधात्मक लसीकरण- 48 वा दिवस


कोविड-19 प्रतिबंधात्मक लसीच्या 1.77 कोटी पेक्षा जास्त मात्रा देण्यात आल्या

आज संध्याकाळी सात वाजेपर्यंत लसींच्या 10.93 लाख मात्रा देण्यात आल्या

Posted On: 04 MAR 2021 9:00PM by PIB Mumbai

देशभरात आतापर्यंत देण्यात आलेल्या कोविड19 प्रतिबंधात्मक लसींच्या मात्रांच्या संख्येने आज 1.77 कोटींचा टप्पा ओलांडला.

या देशव्यापी लसीकरण मोहिमेचा प्रारंभ 16 जानेवारी 2021 रोजी झाला होता आणि आघाडीवरील कर्मचाऱ्यांसाठी( एफएलडब्लू) 2 फेब्रुवारी 2021 पासून लसीकरण सुरू करण्यात आले होते. कोविड19 प्रतिबंधात्मक लसीकरणाच्या पुढील टप्प्यात 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या आणि  विशिष्ट सहव्याधी असलेल्या 45 वर्षे आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींसाठी लसीकरणास 1 मार्च 2021 पासून सुरुवात झाली.

आज मिळालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार संध्याकाळी सात वाजेपर्यंत लसींच्या एकूण 1,77,11,287 मात्रा आतापर्यंत देण्यात आल्या आहेत.

यामध्ये लसीची पहिली मात्रा घेणाऱ्या 68,38,077 आरोग्य कर्मचाऱ्यांचा आणि दुसरी मात्रा घेणाऱ्या 30,82,942 आरोग्य कर्मचाऱ्यांचा, लसीची पहिली मात्रा घेणाऱ्या आघाड्यांवरील 60,22,136 कर्मचाऱ्यांचा, दुसरी मात्रा घेणाऱ्या आघाडीवरील 54,177  कर्मचाऱ्यांचा त्याचप्रमाणे 60 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या 14,95,016  लाभार्थ्यांचा आणि विशिष्ट सहव्याधी असलेल्या 45 वर्षे किंवा त्याहून जास्त वयाच्या 2,18,939  लाभार्थ्यांचा  समावेश आहे.

आज देशव्यापी लसीकरणाच्या 48व्या दिवशी संध्याकाळी सात वाजेपर्यंत लसींच्या एकूण 10,93,954 मात्रा देण्यात आल्या. त्यामध्ये 8,34,141 लाभार्थ्यांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली तर  2,59,813 आरोग्य कर्मचारी आणि आघाडीवरील कर्मचाऱ्यांना लसीची दुसरी मात्रा देण्यात आली. याबाबतचा अंतिम अहवाल आज रात्री उशिरा पूर्ण होईल.

 

***

MC/VS/DY


(Release ID: 1702632) Visitor Counter : 197


Read this release in: English , Urdu , Hindi