संरक्षण मंत्रालय

बालकांतील श्रवणदोष निदान आणि उपचारांसाठीच्या ‘श्रवण’ या संस्थेने केला जागतीक श्रवण दिन साजरा

Posted On: 04 MAR 2021 10:20PM by PIB Mumbai

 

पुणे येथील सदर्न कमांड रुग्णालयाच्या  कान व घसा  विभागाने 24 फेब्रुवारी ते 3 मार्च या जागतिक श्रवण सप्ताहानिमित्त श्रवण या केंद्रात जागतिक श्रवण दिन साजरा केला. श्रवणहे  भारतीय लष्कराच्या संपूर्ण सदर्न कमांड परिक्षेत्रात असलेले बालकांसाठीचे  श्रवण दोष निदान व पुनर्वसन केंद्र आहे. श्रवण दोषावर सातत्यपूर्ण, व्यवस्थित आणि परिणामकारक उपचार पुरवणारे हे केंद्र आहे. या केंद्रातून आतापर्यंत 280 पेक्षा जास्त बालकांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. सध्या 90 मुले या  केंद्रात श्रवण वाचा उपचार घेत आहेत.

सर्वांसाठी श्रवणासंदर्भातील सावधानताही यावर्षीची मुख्य कल्पना आहे. त्याला अनुसरुन अनेक कार्यक्रम गेल्या आठवड्यात आयोजित करण्यात आले होते.  या कार्यक्रमादरम्यान कोविड संदर्भातील खबरदारी आणि सोशल डिस्टंसिंग तत्त्वाचे पालन करण्यात आले.

शिक्षकांसाठी श्रवणदोषांसंबधी जागरुकताकार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये श्रवणदोष असलेल्या मुलांना शाळेच्या वातावरणात येणाऱ्या समस्या आणि त्यावर मात करण्यासंदर्भातील माहिती  यावर  लिहिलेली पत्रके वाटण्यात आली.

1 मार्च 2021 ला एक ऑनलाईन चित्रकला स्पर्धा भरवण्यात आली.  त्यामध्ये कोहलर इम्प्लांट केलेल्या पन्नासहून जास्त मुलांनी भाग घेऊन आपले कलागुण प्रदर्शित केले.

कोहलर इन्प्लांट चमूने दोन बालकांवर कोहलर इन्प्लांट ऑपरेशन केले. या दोघांनाही बायलॅटरल कॉग्निटल प्रोफाउंड श्रवणदोष होता. त्यापैकी एकाला आठवड्यापासून कोहलर नर्वच्या गुंतागुंतीमुळे त्रास होता.  या श्रवण दोष असलेल्या दिव्यांग मुलांना संगीतातील आनंदाचा परिचय व्हावा आणि त्यांच्यासह त्यांच्या पालकांच्या चेहऱ्यावरही आनंद फुलावा म्हणून केंद्र सुधारित दर्जाचे स्पीच प्रोसेसर पुरवण्यात अग्रभागी असते. यामुळे मुलांची श्रवणशक्ती आणि संवादकौशल्य वाढीस लागून त्यांच्या जीवनात परिवर्तन येऊ शकते.

***

M.Iyengar/V.Sahajrao/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1702585) Visitor Counter : 179


Read this release in: English