शिक्षण मंत्रालय

क्यूएस वर्ल्ड यूनिवर्सिटी रँकिंग 2021 कार्यक्रमात केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचे संबोधन


क्यूएस वर्ल्ड यूनिवर्सिटी रँकिंग 2021 मध्ये पहिल्या 100 मध्ये आयआयटी मुंबईसहीत 12 भारतीय संस्थाचा समावेश

Posted On: 04 MAR 2021 9:56PM by PIB Mumbai

 

केंद्रीय मंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी आज क्यूएस वर्ल्ड यूनिवर्सिटी रँकिंग 2021 जाहीर करण्यासाठी आयोजित कार्यक्रमाला संबोधित केले. निती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत, विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष धीरेंद्र सिंग, नॅकचे अध्यक्ष विरेंदर चौहान, अखिल भारतीय तंत्रज्ञान शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अनिल सहस्रबुद्धे, QS रँकिंगचे उपाध्यक्ष बेन सॉटर, QS रँकिंगचे मुल्यमापन प्रमुख ले कॅमोलीन्स, आणि संस्थाध्यक्षांचा यावेळी गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला इतर मान्यवरही दूरस्थ पद्धतीने उपस्थित होते.

Unveiling QS World University Rankings by subject #2021. @PMOIndia @EduMinOfIndia @PIB_India @MIB_India @DDNewslive @transformIndia @mygovindia https://t.co/wRxjoDkVry

— Dr. Ramesh Pokhriyal Nishank (@DrRPNishank) March 4, 2021

या कार्यक्रमात मंत्रीमहोदयांनी बारा भारतीय संस्थांनी 2021च्या QS विषयवार रॅंकींगमध्ये पहिल्या 100तील स्थान टिकवून ठेवल्याबद्दल त्यांचे कौतुक व अभिनंदन केले. गेल्या काही वर्षांमध्ये भारतातील उच्च शिक्षणात विकास आणि सुधारणा व्हाव्यात यावर सरकारने सातत्याने लक्ष केंद्रीत केले आहे. परिणामी, भारतीय संस्थांच्या सुधारलेल्या प्रतिमेला जागतिक स्तरावरील QS रॅंकीग सारख्या नावाजलेल्या व दर्जेदार रॅंकींगमुळे नावाजले जाऊन मान्यता मिळाली आहे, असे ते म्हणाले.

जगभरातील 100 उच्च स्थानावरील संस्थांमध्ये 12 भारतीय संस्थांचा समावेश आहे. या संस्था आहेत : आयआयटी मुंबई, आयआयटी मद्रास, आयआयटी खरगपूर, आयआयएससी बंगळुरू, आयआयटी गुवाहाटी, आयआयएम बंगळुरू, आयआयएम अहमदाबाद, जेएनयू, अन्ना विश्वविद्यालय, दिल्ली विश्वविद्यालय व ओ.पी. जिंदाल विश्वविद्यालय.

या पहिल्या 100 उच्च दर्जाच्या शिक्षण संस्थांपैकी पेट्रोलियम इंजिनयरिंगसाठी  आयआयटी मद्रास 30व्या क्रमांकावर आहेआयआयटी मुंबई 41 व्या तर खनिजे व खनिकर्म यासाठी  आयआयटी खरगपूर 44 व्या स्थानी आहे. डेव्हलपमेंट स्टडीजसाठी दिल्ली विश्वविद्यालय जगभरात 50 व्या स्थानी आहे.

***

S.Tupe/V.Sahajrao/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1702583) Visitor Counter : 238


Read this release in: Hindi , English , Urdu