विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय

केंद्रीय मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांच्या हस्ते केंद्रीय विज्ञान आणि औद्योगिक संशोधन संस्थेच्या (CSIR) पुष्पशेती प्रकल्पाचे उद्घाटन

Posted On: 04 MAR 2021 8:20PM by PIB Mumbai

 

देशभरातील केंद्रीय विज्ञान आणि औद्योगिक संशोधन संस्थेच्या (CSIR) प्रयोगशाळांभोवती उपलब्ध असलेल्या जमिनी, संस्थेच्या पुष्पशेती प्रकल्पाचे नमुने म्हणून विकसित कराव्यात, अशी सूचना केंद्रीय मंत्री डॉ. हर्ष वर्धन यांनी आज केंद्रीय विज्ञान आणि औद्योगिक संशोधन संस्थेच्या शास्त्रज्ञांना केली. 21 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सीएसआयआर फुलांच्या शेती संदर्भातील प्रकल्प राबवण्यास मंजुरी देण्यात आली आहे‌. यामुळे केंद्रीय विज्ञान आणि औद्योगिक संशोधन संस्थांमधील उपलब्ध मूलभूत ज्ञान वापरात येऊन त्याची भारतीय शेतकऱ्यांना मदत होईल. तसेच उद्योगांना फुलांच्या निर्यातीसाठीच्या मानकांची पूर्तता करता आल्याने पुनर्स्थापित होण्यासाठीही त्याचा उपयोग होईल. केंद्रीय मंत्री हर्षवर्धन आज नवी दिल्लीत सीएसआयआर पुष्प शेती प्रकल्पाच्या दूरस्थ पद्धतीने झालेल्या उद्घाटन सोहळ्याच्या वेळी बोलत होते.

 

  

शेतकऱ्यांना पुष्प शेती ही परंपरागत उत्पन्नाच्या पाचपट अधिक उत्पन्न देऊ शकते याची अजिबात कल्पना नसते. पुष्पनर्सरी व्यवसायाची उभारणी, मोठ्या प्रमाणावरील पुष्पशेती, तसेच नर्सरी व्यवसायासाठी नवउद्योजक, नर्सरी व्यवसायाचे मुल्यवर्धन, फुलांची निर्यात अशा अनेक माध्यमातून पुष्पशेती भरपूर जणांना रोजगार पुरवू शकते, असे हर्षवर्धन यांनी नमूद केले.

सीएसआयआर च्या पुष्पशेती प्रकल्पातून फुलांच्या शेतीचे तंत्र, नवीन वैशिष्ठ्यपूर्ण विविध जाती आणि सीएसआयआर संस्थांमध्ये उपलब्ध असणारे मूल्यवर्धनाचे तंत्र शेतकरी आणि नवउद्योजकांपर्यंत घेऊन जाण्यासाठी प्रयत्न केले जातील ज्यामुळे त्यांचे उत्पन्न वाढण्यासाठी सहाय्य होईल, असेही मंत्रीमहोदयांनी सांगितले.

केंद्रीय विज्ञान आणि औद्योगिक संशोधन संस्थेचा पुष्पशेती प्रकल्प हा फुलांच्या शेतीत नवउद्योजकांना संधी निर्माण करून देईल अशी आशा आहे.

यावेळी डॉ. हर्ष वर्धन यांनी केंद्रीय विज्ञान आणि औद्योगिक संशोधन संस्थेचे पोर्टल आणि अँड्रॉइड ॲपचेही उदघाटन केले.

 

  

***

S.Tupe/V.Sahajrao/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1702556) Visitor Counter : 220


Read this release in: English , Urdu , Hindi