आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
कोविड19 प्रतिबंधक लसीकरण- 47 वा दिवस
कोविड-19 प्रतिबंधक लसीच्या 1.63 कोटी पेक्षा जास्त मात्रा देण्यात आल्या
आज संध्याकाळी सात वाजेपर्यंत लसींच्या 6.92 लाख मात्रा देण्यात आल्या.
प्रविष्टि तिथि:
03 MAR 2021 8:58PM by PIB Mumbai
देशभरात आतापर्यंत देण्यात आलेल्या कोविड19 प्रतिबंधक लसींच्या मात्रांच्या संख्येने आज 1.63 कोटींचा टप्पा ओलांडला. या देशव्यापी लसीकरण मोहिमेचा प्रारंभ 16 जानेवारी 2021 रोजी झाला होता आणि आघाडीवरील कर्मचाऱ्यांसाठी( एफएलडब्लू) 2 फेब्रुवारी 2021 पासून लसीकरण सुरू करण्यात आले होते. 60 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या आणि विशिष्ट सहव्याधी असलेल्या 45 वर्षे आणि त्यापेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींसाठी कोविड19 प्रतिबंधक लसीकरणाच्या पुढील टप्प्याची 1 मार्च 2021 पासून सुरुवात झाली. आज मिळालेल्या तात्पुरत्या अहवालानुसार संध्याकाळी सात वाजेपर्यंत लसींच्या एकूण 1,63,14,485 मात्रा आतापर्यंत देण्यात आल्या आहेत. यामध्ये लसीची पहिली मात्रा घेणाऱ्या 67,75,619 आरोग्य कर्मचाऱ्यांचा आणि दुसरी मात्रा घेणाऱ्या 28,24,311 आरोग्य कर्मचाऱ्यांचा, लसीची पहिली मात्रा घेणाऱ्या विविध आघाड्यांवरील 57,62,131 कर्मचाऱ्यांचा, दुसरी मात्रा घेणाऱ्या आघाडीवरील 3277 कर्मचाऱ्यांचा, 60 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या 8,44,884 लाभार्थ्यांचा आणि विशिष्ट सहव्याधी असलेल्या 45 वर्षे आणि त्यावरील 1,04,263 लाभार्थ्यांचा समावेश आहे.
आज देशव्यापी लसीकरणाच्या 47 व्या दिवशी संध्याकाळी सात वाजेपर्यंत लसींच्या एकूण 6,92,889 मात्रा देण्यात आल्या. त्यामध्ये 5,79,366 लाभार्थ्यांना लसीची पहिली मात्रा देण्यात आली. 1,13,523 आरोग्य कर्मचारी आणि आघाडीवरील कर्मचाऱ्यांना लसीची दुसरी मात्रा देण्यात आली. याबाबतचा अंतिम अहवाल आज रात्री उशिरा पूर्ण होईल.
***
(रिलीज़ आईडी: 1702419)
आगंतुक पटल : 275