दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

केंद्रीय मंत्री संजय धोत्रे यांनी “इंडिया टेलिकॉम 2021” या तंत्रज्ञान आणि व्यवसाय आदानप्रदान व्यासपीठाचे उद्घाटन केले


45 हून अधिक देशांचे दूरसंचार क्षेत्रातील खरेदीदार या कार्यक्रमात सहभागी झाले

Posted On: 03 MAR 2021 10:20PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 3 मार्च 2021


टीईपीसीने (दूरसंचार उपकरण निर्यात प्रोत्साहन परिषद) इंडिया टेलिकॉम 2021’ आयोजित केले आहे. हे एक विशेष आंतरराष्ट्रीय व्यापार प्रदर्शन असून दूरसंचार व परराष्ट्र मंत्रालयाच्या सहकार्याने वाणिज्य विभागाच्या बाजारपेठ प्रवेश योजने (एमएआय) अंतर्गत 3 आणि 4 मार्च 2021 रोजी व्हर्च्युअली आयोजित केले आहे. या प्रदर्शनात  एक हजाराहून अधिक प्रतिनिधी सहभागी होत आहेत, त्यापैकी 200 हून अधिक प्रतिनिधी 45 हून अधिक देशांमधील आहेत. 40 हून अधिक भारतीय दूरसंचार कंपन्या आपली अत्याधुनिक उत्पादने आणि क्षमता प्रदर्शित करत आहेत.

या वार्षिक कार्यक्रमाचे उद्घाटन 3 मार्च 2021  रोजी, दळणवळण, शिक्षण आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री संजय शामराव धोत्रे यांच्या हस्ते झाले.

या कार्यक्रमात बोलताना दळणवळण, शिक्षण व इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान राज्यमंत्री संजय शामराव धोत्रे म्हणाले की, देशातील डिजिटल दरी साधण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे डिजिटल इंडियाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. ग्रामीण आणि शहरी भारताला एकत्र आणणे, प्रत्येकासाठी महत्वपूर्ण सेवा उपलब्ध करुन देणे आणि शेवटच्या ठिकाणापर्यंत कनेक्टिव्हिटी प्रदान करुन आर्थिक समावेशाला चालना देणे हा यामागचा उद्देश आहे.  भारतीय उत्पादकांनी यापूर्वीच अनेक देशांना माहिती तंत्रज्ञान आणि दूरसंचार उत्पादनांच्या निर्यात करून  महत्त्वपूर्ण प्रगती केल्याचेही त्यांनी नमूद केले. भारतीय आयटी आणि टेलिकॉम उत्पादने ही जागतिक दर्जाची असून तंत्रज्ञान आणि किंमतीच्या बाबतीत जागतिक स्तरावर स्पर्धात्मक आहेत., "जागतिक पुरवठा साखळीचा भाग होण्यासाठी दूरसंचार क्षेत्रासह विविध क्षेत्रांसाठी प्रोत्साहन संलग्न प्रोत्साहन (पीएलआय) योजना जाहीर केल्या आहेत." असेही ते म्हणाले.

इंडिया टेलिकॉम 2021 तंत्रज्ञान आणि व्यवसाय आदानप्रदानाचे एक व्यासपीठ आहे. टेलिकॉम आणि आयटी हितधारकांसाठी हा भव्य कार्यक्रम महत्वपूर्ण आहे  कारण त्यात विविध क्षेत्रात आयसीटी सेवांची मोठी मागणी काबीज करण्याची क्षमता असलेल्या दोन सर्वात महत्त्वाच्या उद्योगांसाठी धोरण आखणीचा समावेश आहे.

टीईपीसी बद्दलः

दूरसंचार उपकरणे व सेवांच्या निर्यातीला प्रोत्साहन व विकास करण्यासाठी केंद्र सरकारच्या वाणिज्य व उद्योग मंत्रालय आणि दळणवळण  मंत्रालय यांनी टीईपीसीची स्थापना केली आहे. संभाव्य बाजारपेठ शोधण्यासाठी अभ्यास सुरू करणे, राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय चर्चासत्रे आयोजित करणे आणि विविध परदेशी प्रदर्शनात निर्यातदारांचा सहभाग सुलभ करून निर्यातीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने ही परिषद अनेक उपक्रम राबवते. ही परिषद आपल्या सदस्यांना व्यापाराशी संबंधित माहितीही पुरवते. निर्यात आणि सेवांच्या प्रोत्साहनासाठी असलेल्या धोरणे आणि प्रक्रियेत आवश्यक ते बदल करण्यासाठी परिषद सरकारकडे विविध शिफारसी करते.


* * *

S.Tupe/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1702358) Visitor Counter : 178


Read this release in: Urdu , English , Hindi