आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय
केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी श्रवण दिनानिमित्त जागतिक आरोग्य संघटनेचा जागतिक श्रवण अहवाल सादर केला
Posted On:
03 MAR 2021 9:40PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 3 मार्च 2021
जागतिक श्रवण दिनाचे औचित्य साधत, जागतिक आरोग्य संघटनेच्या कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष म्हणून केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ हर्ष वर्धन यांनी डब्ल्यूएचओ चा श्रवण जागतिक अहवाल प्रसिद्ध केला.
कानांच्या आरोग्याचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी डॉ. हर्ष वर्धन यांनी डब्ल्यूएचओच्या 2018 सालच्या अहवालाचा संदर्भ दिला. भारतातील 2% लोक, मुख्यत: मुले ओटिटिस मीडियाच्या आजाराने त्रस्त आहेत असे या अहवालात नमूद केले आहे. “काही लोकांना ही परिस्थिती इतकी सामान्य वाटते की मुलांना ऐकू न येणे हे त्यांना नैसर्गिक वाटते,” असे ते म्हणाले. कामाच्या ठिकाणी आणि रस्त्यावरील मोठ्या आवाजामुळे श्रवण क्षमता कमी होणे, ओटोटॉक्सिक औषधे आणि रसायनांचा वापर केल्यामुळे श्रवणशक्ती कमी होणे, मोठ्या आवाजात संगीत ऐकल्यामुळे उद्भवणारे धोके यासारख्या इतर समस्यांवरही त्यांनी यावेळी प्रकाश टाकला. (भारतात 750 दशलक्षहून अधिक लोकं स्मार्ट फोन वापरतात)
डॉ. हर्ष वर्धन यांनी 'बहिरेपणावरील प्रतिबंध आणि नियंत्रण यासाठी भारताच्या राष्ट्रीय कार्यक्रमा’ चे सादरीकरण केले यामध्ये श्रवणशक्ती कमी असणारे आणि उपचाराची आवश्यकता असणाऱ्या 6% लोकांवर लक्ष्य केंद्रित केले आहे. हा कार्यक्रम बहिरेपणा रोखण्यावर लक्ष केंद्रित करतो, विशेषत: कानात संक्रमण आणि आवाजामुळे होणारे नुकसान; कर्णबधिर मुलांची लवकर ओळख आणि श्रवणविषयक अडचणी; औषधे, शस्त्रक्रिया, श्रवणयंत्र आणि पुनर्वसन यासारखे योग्य उपचार आणि सेवांची वेळेवर तरतूद करण्यावर देखील लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत वर्ष 2019-20 दरम्यान 30 हजारांहून अधिक नि: शुल्क ईएनटी शस्त्रक्रिया आणि सुमारे 24 हजार श्रवण यंत्रांचे वाटप करण्यात आले आहे.
* * *
S.Tupe/S.Mhatre/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1702351)
Visitor Counter : 197