प्रधान वैज्ञानिक सल्लागार कार्यालय, भारत सरकार

प्रधान वैज्ञानिक सल्लागार कार्यालयाद्वारे "स्वच्छता सारथी" शिष्यवृत्तीला सुरुवात

Posted On: 01 MAR 2021 7:51PM by PIB Mumbai

 

टाकाऊ ते टिकाऊ (वेस्ट टू वेल्थ) अभियाना अंतर्गत भारत सरकारच्या प्रधान वैज्ञानिक सल्लागार कार्यालयाने कचरा व्यवस्थापन आव्हानाचा सामना करणाऱ्या विद्यार्थी, समाजसेवक/स्वयं सहाय्यता गट आणि नगरपालिका/सफाई कामगारांसाठी स्वच्छता सारथी शिष्यवृत्ती सुरू केली. टाकाऊ ते टिकाऊ अभियान हे पंतप्रधानांच्या विज्ञान, तंत्रज्ञान आणि नवोन्मेश सल्लगार परिषदेच्या (पीएम-एसटीआयएसी) च्या नऊ राष्ट्रीय अभियानापैकी एक आहे.

कचरा व्यवस्थापन/जागरूकता मोहीम/कचरा सर्वेक्षण/ अभ्यास आदी सामाजिक कार्य करणाऱ्या तरुण नवनिर्मात्यांना स्वच्छता सारथी म्हणून सक्षम बनविण्यासाठी आणि पृथ्वीवरील कचरा कमी करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

शहर व ग्रामीण भागातील कचरा कमी करण्यासाठी निरंतर प्रयत्न करणास इच्छुक असणाऱ्या विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना सक्षम बनविणे हा या शिष्यवृत्तीचा उद्देश आहे.

शिष्यवृत्तीची घोषणा करताना भारत सरकारचे प्रधान वैज्ञानिक सल्लागार प्रा. के. विजयराघवन म्हणाले : विविध संस्कृतींनी संपन्न असलेला भारत हा आपल्या पद्धती आणि जीवनशैलीसह अनेक पर्यावरणीय आव्हानांचा सामना करत आहे.  कचरा व्यवस्थापन ही एक गंभीर समस्या आहे ज्याचा परिणाम खूप खोलवर पडतो बहुतांश वेळा जे कचरा करतात ते तो साफ करत नाहीत. स्वच्छता सारथी शिष्यवृत्तीसाठी समाजातील विविध स्तरातील लोकांची निवड केली जाईल जे कचरा व्यवस्थापनासंदर्भातील कार्यात आपले कर्तव्य बजावतील आणि वैज्ञानिक आणि शाश्वत पद्धतीने कचऱ्याचे व्यवस्थापन करतील.

शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 मार्च 2021 असून या अंतर्गत कमाल 500 जणांना मान्यता दिली जाईल.

तपशील आणि अर्जाची लिंक https://www.wastetowealth.gov.in/fellowship  या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

शिष्यावृत्तीविषयी अधिक माहितीसाठी Swapan.mehra@investindia.org.in  आणि Malyaj.varmani@investindia.org.in  वर संपर्क साधा.

***

S.Tupe/S.Mhatre/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1701778) Visitor Counter : 290


Read this release in: English , Urdu , Hindi