संरक्षण मंत्रालय

अंदमान निकोबार कमांडने स्वराज द्विप येथे केलेल्या प्रेक्षणीय संयुक्त सेवा संचालन प्रात्यक्षिकांना राष्ट्रपतींची उपस्थिती

Posted On: 28 FEB 2021 8:00PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 28 फेब्रुवारी 2021

 

राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज 28 फेब्रुवारी 2021 रोजी अंदमान मधील  राधानगर समुद्रकिनारा (बीच) स्वराज द्विप येथे संयुक्त सेवा संचालन प्रात्यक्षिकांना उपस्थित होते. संरक्षण दलाची  सर्व लढाऊ दले आणि अंदमान आणि निकोबार कमांड (एएनसी) च्या सैन्याने बहुउद्देशीय परिचालन क्षमतांचे प्रदर्शन तसेच समुद्रात नेत्रदीपक लँडिंगही  केले.

अंदमान आणि निकोबार कमांड चे कमांडर-इन-चीफ लेफ्टनंट जनरल मनोज पांडे यांनी राष्ट्रपतींना परिचालन क्षमता व कमांडची सज्जता याविषयी माहिती दिली. भारतीय नौदलाच्या ताफ्यातील चौदानौका, तटरक्षक दलाची वेगवान हल्ला करणारया दोन नौका, भारतीय वायुसेनेचे विमाने आणि सहा बीएमपी सह भारतीय लष्कराच्या 300 हून अधिक सैन्याने देशाच्या एकमेव अशा त्तीन्ही दलांची संयुक्त कमांड असलेल्या लढाऊ शक्तीचा एकात्मिक प्रयोग दर्शविला. प्रात्यक्षिकात इच्छित परिणाम मिळविण्याच्या दिशेने सेवांमधील समन्वय, सहकार्य आणि परस्पर कार्यक्षमतेवर प्रकाश टाकला. परिचलन प्रात्यक्षिकात अनेक संयुक्त कृतीचे प्रदर्शन केले.


* * *

Jaydevi PS/S.Mhatre/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1701566) Visitor Counter : 184


Read this release in: English , Urdu , Hindi