विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय
जैव-तंत्रज्ञान विभागाचा 35 वा स्थापना दिन साजरा
‘जैव-तंत्रज्ञानाचा भारतातील 35 वर्षातला विकास-एक रोमांचक प्रवास’ या विषयावरील वेबिनारचे आयोजन
जैव-तंत्रज्ञान नवोन्मेष आणि तंत्रज्ञान उत्कृष्टता पुरस्कार (BRITE) प्रदान
‘जैवतंत्रज्ञान विभागाचा कोविडशी लढा-विषाणूपासून लसीपर्यंत’ या विषयावरील ई-बुकचे प्रकाशन
Posted On:
27 FEB 2021 9:50PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 27 फेब्रुवारी 2021
जैव तंत्रज्ञान विभागाचा 35 वा स्थापना दिवस आहे साजरा करण्यात आला. “या विभागाने कोविड विरुद्धच्या लढाईत दिलेले योगदान अत्यंत उल्लेखनीय असे होते आत्मनिर्भर भारत 3.0 अंतर्गत या विभागाला कोविड सुरक्षा करण्यासाठी आणि कोविड 19 च्य लसीच्या विकासासाठी 900 कोटी रुपयांचा विशेष निधी देण्यात आला आहे, असे यावेळी मुख्य वक्त्यांनी सांगितले.
हा स्थापना दिवस दूर दृश्य प्रणालीच्या माध्यमातून साजरा करण्यात आला. जैव-तंत्रज्ञान क्षेत्रात भारताला आत्मनिर्भर बनवण्यासाठी हा विभाग खूप जास्त प्रयत्न करत आहे, असेही यावेळी वक्त्यांनी सांगितले. राष्ट्रीय जैव वैद्यकीय संसाधन भारतीयीकरण महासंघ हे त्याचेच उदाहरण आहे. कोविड19 चे निदान, लस आणि उपचार या सर्वच बाबतीत भारताला स्वयंपूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे. असे त्यांनी सांगितले.
यावेळी आणखी काही नामवंत वक्त्यांनी गेल्या वर्षी डीबीटी ने सुरु केलेल्या कृषी-जैव तंत्रज्ञान मोहिमेचे कौतुक केले. या मोहिमेअंतर्गत, बायोटेक किसान कार्यक्रम देशातील 105 अविकसित जिल्ह्यांमध्ये राबवला जात असून 50,000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांना त्याचा लाभ झाला आहे. या मोहिमेत बियाणांचे अनेक सुधारित वाण संशोधित करण्यात आले आहेत. डीबीटी-एनजीजीएफ –राष्ट्रीय जेनोटायपिंग आणि जिनोम्स सुविधा- अंतर्गत पिकांची सुधारित जनुके संशोधित करण्याचे तंत्रज्ञान आणि जीनोटायपिंग सेवा,सार्वजनिक आणि खाजगी संस्थामध्ये स्थापन करण्यात आली आहे. मक्याच्या तीन संकरित प्रजाती देखील विकसित करण्यात आल्या आहेत. त्याशिवाय कृषी क्षेत्रासाठी जैव तंत्रज्ञानाच्या मदतीने केलेल्या संशोधनाचा उल्लेखही यावेळी करण्यात आला.
देशात निर्माण झालेला जैव वैद्यकीय डेटा ठेवण्यासाठी, साठा करण्यासाठी, त्यावर टिप्पणी करण्यासाठी डीबीटीने इंडियन बायोलॉजिकल डेटा सेंटर स्थापन केले आहे. भारतीय लोकसंख्येच्या जनुकीय वैविध्याचे दस्तऐवज तयार करण्याचे काम सुरु झाले असून, जिनोम सिक्वेन्सिंग आणि त्याच्याशी संबंधित माहिती पृथक्करणासाठी 10,000 व्यक्तींचे अध्ययन करण्याचा उद्देश आहे, असे वक्त्यांनी सांगितले.
यावेळी विविध श्रेणीत, प्रतिष्ठेच्या जैव तंत्रज्ञान संशोधन नवोन्मेष आणि तंत्रज्ञान उत्कृष्टता पुरस्कार BRITE देखील प्रदान करण्यात आले.
तसेच डीबीटी ने कोविड काळात राबवलेले उपक्रम आणि उपलब्धींची माहिती देणारे, “ डीबीटीचा कोविडशी लढा- विषाणू ते लस” या ई-पुस्तिकेचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले.
डीबीटीच्या सचिव डॉ रेणू स्वरूप यांनी यावेळी डीबीटी ने विविध क्षेत्रात केलेल्या विविध सुधारणांची तसेच महत्वाच्या संशोधनांची माहिती दिली. केंद्र सरकारच्या विविध योजनांमध्ये या विभागाने दिलेल्या महत्वपूर्ण योगदानाचाही त्यांनी उल्लेख केला
या स्थापना दिनानिमित्त ‘जैव-तंत्रज्ञानाचा भारतातील 35 वर्षातला विकास-एक महत्वपूर्ण प्रवास’ या विषयावरील वेबिनारचे आयोजन आयोजनही करण्यात आले होते.
* * *
Jaydevi PS/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1701435)
Visitor Counter : 310