अर्थ मंत्रालय
सार्वभौम सुवर्ण रोखे योजना 2020-21( मालिका XII)- इश्यू किंमत
Posted On:
26 FEB 2021 10:13PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 26 फेब्रुवारी 2021
भारत सरकारची 9 ऑक्टोबर 2020 ची अधिसूचना क्र. 4(4) B(W&M)/2020 नुसार सार्वभौम सुवर्ण रोखे योजना 2020-21( मालिका XII) 1 ते 5 मार्च 2021 या कालावधीत खुली होणार आहे. तिची सेटलमेंट तारीख 9 मार्च 2021 आहे. या रोख्यांची सदस्यत्व कालावधीदरम्यान इश्यू किंमत 4,662 रुपये (रुपये चार हजार सहाशे बासष्ट फक्त) प्रति ग्राम असेल. रिझर्व बँकेने 26 फेब्रुवारी 2021 रोजी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात देखील ती नमूद केली आहे. जे गुंतवणूकदार या रोख्यांसाठी ऑनलाईन अर्ज करतील आणि डिजिटल माध्यमातून त्याचे पैसे चुकते करतील त्यांना प्रति ग्राम 50 रुपये सवलत देण्याचा निर्णय भारत सरकारने रिझर्व बँकेशी विचारविनिमय करून घेतला आहे. अशा गुंतवणुकदारांसाठी या सुवर्ण रोख्यांची किंमत 4612 रुपये( रुपये चार हजार सहाशे बारा फक्त) प्रति ग्राम सोने अशी असेल.
Jaydevi PS/S.Patil/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1701252)
Visitor Counter : 247