रसायन आणि खते मंत्रालय

केंद्रीय मंत्री डी.व्ही. सदानंद गौडा यांच्या हस्ते चार दिवसीय इंडिया फार्मा 2021 आणि इंडिया मेडिकल डिव्हाइस 2021 जागतिक गुंतवणूकदार मेळाव्याचे उद्घाटन


आत्मनिर्भर भारताच्या स्वप्नपूर्तीसाठी सरकारने घाऊक औषधे आणि वैद्यकीय उपकरणांसाठी पीएलआय योजनेत 10,000 कोटींहून अधिक तरतूद केली - डी. व्ही. सदानंद गौडा

कोविड -19 लसीसाठी बौद्धिक संपदा सवलतीच्या मागणीसाठी 57 देश भारताच्या नेतृत्वात सामील झालेः पीयुष गोयल

Posted On: 25 FEB 2021 7:10PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 25 फेब्रुवारी 2021 


केंद्रीय रसायने आणि खते मंत्री  डी. व्ही. सदानंद गौडा यांनी चार दिवसांच्या इंडिया फार्मा 2021 आणि इंडिया मेडिकल डिव्हाइस 2021  जागतिक गुंतवणूकदार मेळाव्याचे उदघाटन केले.  फिक्कीने औषध निर्मिती विभाग,  रसायन व खते मंत्रालय, आणि इन्व्हेस्ट इंडिया यांच्या सहकार्याने या मेळाव्याचे आयोजन केले आहे. रेल्वे, वाणिज्य व उद्योग, ग्राहक व्यवहार व अन्न व सार्वजनिक वितरण मंत्री पीयुष गोयल यांची व्हर्च्युअली उपस्थित होती. रसायन व खते राज्यमंत्री मनसुख मांडवीय हे देखील कार्यक्रमाला उपस्थित होते. ‘इंडियन फार्मास्युटिकल इंडस्ट्री 2021: फ्यूचर इज नाऊ’ शीर्षक असलेला ईवाय-फिक्की अहवाल या कार्यक्रमादरम्यान प्रकाशित करण्यात आला.

याप्रसंगी बोलताना  डी.व्ही. सदानंद गौडा यांनी कोविड -19 महामारी दरम्यान  औषधे आणि वैद्यकीय उपकरणांचा जागतिक आणि विश्वासार्ह पुरवठादार म्हणून भारताच्या क्षमतांचे कौतुक केले.

गौडा पुढे म्हणाले, “आपण जागतिक स्तरावर व्हेंटिलेटर, आरटी-पीसीआर कीट, पीपीई किट्स आणि मास्क यासारखी असंख्य कोविड संबंधित वैद्यकीय उपकरणे पुरवली आणि आपली उत्पादन क्षमता अक्षरशः शून्यावरुन 0.5 दशलक्ष पर्यंत वाढवली. भारतातील वैद्यकीय उपकरणे उद्योगात 2025 पर्यंत 50 अब्ज डॉलर्स पर्यंत पोहचण्यासाठी वार्षिक 28 टक्के दराने वाढण्याची क्षमता आहे, असेही ते म्हणाले.

गौडा पुढे म्हणाले, “इंडिया फार्मा मेडिकल डिव्हाइस  2021 मध्ये  उद्योगातील संभाव्यतेची जाणीव करून देणारे  मार्ग ओळखणे हे उद्दीष्ट आहे ज्यायोगे आपण आव्हानावर मात करून आणि शाश्वत विकासाचा आराखडा तयार करून दर्जेदार औषधे आणि वैद्यकीय उपकरणांचा सक्षम  पुरवठादार म्हणून उदयास येऊ शकतो.”

उपस्थितांना  संबोधित करताना पीयुष  गोयल म्हणाले, “कोविड -19  लसीसाठी बौद्धिक  संपदा सवलतीच्या  मागणीसाठी 57 देश भारताच्या नेतृत्वात सामील झालेः आहेत.  सर्वचजण  आव्हानाचा सामना करत असून संपूर्ण जगासाठी परवडणार्‍या आरोग्य सेवेसाठी पंतप्रधान मोदींनी केलेल्या  आवाहनात सहभागी होत आहेत.  जागतिक स्तरावर, भारत संपूर्ण आरोग्य परिसंस्थेसाठी वन स्टॉप सोल्यूशन प्रदाता आहे आणि आरोग्याशी संबंधित कोणत्याही समस्येला  सामोरे जाण्यासाठी आत्मविश्वास आहे. नियामक व चांगल्या उत्पादन पद्धती, प्रणाली व प्रमाणीकरण, मंजुरी, आपल्यला नेहमीच व्यापक प्रमाणात वाढण्यास आणि किंमती कमी करण्यात मदत करतील.”

मनसुख मांडवीय म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारताने कोविड -19 विरोधात  जागतिक पातळीवर यशस्वी लढा दिला.


* * *

S.Thakur/S.Kane/D.Rane


(Release ID: 1700860) Visitor Counter : 148


Read this release in: English , Hindi , Kannada