सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी 18 राज्यातल्या 50 स्फूर्ती क्लस्टरचे केले उद्घाटन, पारंपरिक कलेतल्या 42,000 कारागिरांना मिळणार सहाय्य

Posted On: 22 FEB 2021 9:55PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 22 फेब्रुवारी 2021

 

केंद्रीय, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नितीन गडकरी यांनी आज 18 राज्यातल्या 50 स्फूर्ती क्लस्टरचे उद्घाटन केले. आज उद्घाटन झालेल्या 50 क्लस्टरमध्ये  मलमल, खादी, हस्तकला, हातमाग, चामडे, पॉटरी, गालिचे विणणे,बांबू, कृषी प्रक्रिया या पारंपारिक विभागांचा समावेश आहे. या 50 क्लस्टरच्या विकासासाठी सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगाने 85 कोटी रुपयांचा निधी दिला आहे. पारंपारिक उद्योग आणि कारागिरांना क्लस्टर मध्ये आणून त्यांना स्पर्धात्मक बनवण्यासाठी आणि त्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी  सूक्ष्म, लघु आणि मध्यम  उद्योग स्कीम ऑफ फंड फॉर रीजनरेशन ऑफ ट्राडीशनल इंडस्ट्री, स्फूर्ती या योजनेची अंमलबजावणी करत आहे. ग्राहकांना कोणत्या प्रकारची ग्रामीण उत्पादने हवी आहेत याबाबत आणि ही उत्पादने आकर्षक करण्यासंदर्भात अधिक संशोधनाची आवश्यकता गडकरी यांनी व्यक्त केली. देशात आणि परदेशातही  या उत्पादनांच्या प्रभावी विक्रीसाठी ॲमेझोन, अलिबाबा या सारख्या वेब पोर्टलची गरज असल्याचे ते म्हणाले. असे क्लस्टर स्थापन करण्याचा वेग वाढवण्याची गरज असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. जाहीर केलेल्या 371 पैकी केवळ 82 क्लस्टर कार्यान्वित झाले असून लाल फित शाही कमी झाल्यास 5000 क्लस्टरचे उद्दिष्ट सहज साध्य असल्याचे गडकरी म्हणाले. 

सध्या 371 क्लस्टरना हे मंत्रालय 888 कोटी रुपयांचे  आर्थिक पाठबळ पुरवत असून यातून  2.18  लाख कारागिरांना सहाय्य मिळत आहे. येत्या काळात प्रत्येक जिल्ह्यात एक क्लस्टर असावे  असे मंत्रालयाचे उद्दिष्ट आहे.

कॉमन फेसिलीटी सेंटर, नव्या यंत्र सामग्रीची खरेदी, कच्या  मालाची बँक,आकर्षक वेष्टन, प्रशिक्षणाद्वारे कौशल्य आणि क्षमता वृद्धी या सारख्या उपक्रमांना या योजने अंतर्गत  सहाय्य पुरवण्यात येत आहे.

 

* * *

M.Chopade/N.Chitale/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1700052) Visitor Counter : 223


Read this release in: English , Hindi