अर्थ मंत्रालय
आयजीएसटी परताव्यांबद्दल समस्या असलेल्या निर्यातदारांसाठी केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळाकडून सुविधा
Posted On:
22 FEB 2021 8:12PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 22 फेब्रुवारी 2021
ज्या करपरतव्यांमध्ये GSTR1 आणि GSTR3B यांच्यातील आकडेवारी जुळत नसल्याने ती प्रकरणे अद्याप ICEGATE कडे पाठवण्यात आलेली नाहीत, आणि त्यामुळे प्रलंबित राहिलेल्या IGST परताव्यांसाठी केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमाशुल्क मंडळ- CBIC ने मुदतवाढ दिली आहे.
यामुळे अद्याप न दिलेल्या परताव्यांची समस्या सुटू शकेल. निर्यातदारांनी आपल्या लेखापालाच्या सहीने हमीपत्र/निवेदन लिहून दिल्यास आणि परताव्यानंतरही लेखापरीक्षण छाननीसाठी हमी दिल्यास, हे परतावे जारी करण्याची परवानगी दिली जाऊ शकेल. मंडळाच्या 04/2021परिपत्रकानुसार ही सुविधा देण्यात आली असून 31 मार्च 2021 नंतरच्या सर्व शिपिंग बिलांना ही सुविधा लागू असेल.
तसेच सीबीआयसी ने बिलांमधील आकडेवारी जुळत नसल्यास (ज्याला SB-005 एरर असे म्हटले जाते) त्यावर तोडगा काढण्यासाठीच्या सुविधेलाही परिपत्रक 05/2021 नुसार कायमस्वरूपी मुदतवाढ दिली आहे. ग्राहक-अधिकारी यांच्यातील समोरासमोर चर्चेतून यावर तोडगा काढता येईल. आधी ही सुविधा केवळ 31 डिसेंबर.2019 पूर्वीच्या शिपिंग बिलांनाच लागू होती.
* * *
M.Chopade/R.Aghor/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1700032)
Visitor Counter : 183