उपराष्ट्रपती कार्यालय
उपराष्ट्रपतींनी आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिवंगत एन. टी. रामराव यांना श्रद्धांजली वाहिली
Posted On:
18 FEB 2021 9:03PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 फेब्रुवारी 2021
उपराष्ट्रपती, एम वेंकैया नायडू यांनी आज आंध्र प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिवंगत एन. टी. रामा राव यांना श्रद्धांजली वाहिली. एन. टी. रामा राव हे अभिनेता-राजकारणी म्हणून अद्भुत होते ज्यांनी राजकीय रंगमंचावर एखद्या महापुरुषाप्रमाणे अधिराज्य गाजवले असे नायडू यावेळी म्हणाले.
ज्येष्ठ पत्रकार रमेश कंदुला यांनी लिहिलेले राजकीय जीवनचरित्र ‘मॅव्हरिक मसीहा’ हे पुस्तक प्रकाशित करताना उपराष्ट्रपती म्हणाले की एनटीआर यांच्या राजकीय प्रवेशानंतर राजकीय पटलावर महत्वपूर्ण बदल झाले. “सत्ते संदर्भात एनटीआरच्या बाबतीत बोलायचे झाले तर खऱ्या अर्थाने जनतेने त्यांना सत्ता दिली”, असे ते म्हणाले.
तत्कालीन संयुक्त आंध्र प्रदेशात एनटीआर यांनी राजकीय संस्कृतीची व्याख्या नव्याने परिभाषित केली आणि एक नवीन राजकीय व्याख्या उदयास आली, लेखकाने या गोष्टी अगदी योग्यपणे दाखविल्या आहेत असे नायडू म्हणाले.
‘पर्यायी राजकारण’ च्या अग्रगण्य प्रवर्तकांमध्ये एनटीआर यांना स्थान देण्यात आले आहे असे नायडू म्हणाले. त्यांचा राजकारणातील प्रवेश आणि त्यांनी स्थापन केलेल्या प्रादेशिक पक्षाने सुमारे 9 महिन्यांच्या आत मिळवलेल्या ‘नाट्यमय’ यशामुळे राष्ट्रीय राजकारणाला नवी दिशा मिळाली.
आताच्या प्रादेशिक आकांक्षा वाढत असताना राज्यघटनेची संघीय वैशिष्ट्य बळकट करण्यासाठी त्यांनी त्याकाळी दिलेला लढा आणि सरकारच्या कल्याणकारी भूमिकेवर त्यांनी दिलेला भर आजच्या काळाशी सुसंगत आहे, असे उपराष्ट्रपतींनी नमूद केले.
विरोधक म्हणून राष्ट्रीय पातळीवरील एनटीआर यांचे योगदान अत्यंत महत्वपूर्ण आहे असे नायडू म्हणाले. या संदर्भात उपराष्ट्रपती म्हणाले की लोकशाहीमध्ये निकोप, खंबीर आणि विधायक विरोधी पक्ष नेहमीच प्रासंगिक असतील.
एनटीआर यांनी आमूलाग्र व दूरगामी कायदेविषयक व प्रशासकीय उपक्रम राबविल्याचे निदर्शनास आणून देताना नायडू म्हणाले की त्यांचा पहिला उपक्रम म्हणजे समाज आणि राज्यातील भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करण्यासाठी त्यांनी अंमलात आणलेला उप-लोकपाल कायदा.
एक अभिनेता म्हणून एनटीआर महान होते. “हे सर्व मान्य आहे की, दुसऱ्या कोणत्याही चित्रपट अभिनेत्याने पुराणातील- भगवान राम, भगवान श्रीकृष्ण, अर्जुन, कर्ण, दुर्योधन किंवा रावण यांच्या भूमिका इतक्या सहजतेने केल्या नाहीत. एनटीआर यांनी आपल्या सहज, सुंदर आणि सखोल अभिनय शैलीने या सर्व भूमिकांचे सोने केले”, असे नायडू म्हणाले.
अधिक माहितीसाठी कृपया येथे क्लिक करा.
M.Chopade/S.Mhatre/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1699201)
अभ्यागत कक्ष : 163