वाणिज्य आणि उदयोग मंत्रालय
केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी भारत-सिंगापूर सीईओ फोरमला केले संबोधित
लोकांमध्ये जास्तीत जास्त संपर्क वाढवून सिंगापूर-भारत आपले परस्पर संबंध आणखी दृढ करू शकतात : केंद्रीय मंत्री पियुष गोयल
Posted On:
18 FEB 2021 6:44PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 18 फेब्रुवारी 2021
रेल्वेमंत्री, वाणिज्य आणि उद्योग मंत्री तसेच ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री पियुष गोयल यांनी भारत -सिंगापूर प्रमुख कार्यकारी अधिकारी मंचाला आज संबोधित केले. भारत आणि सिंगापूरमधील भागीदारी बळकट करण्याविषयी ते बोलले.
भारत आणि सिंगापूर भागिदारी मजबूत आणि चांगली असून तिला नव्या ऊंचीवर नेता येईल असे ते म्हणाले. या भागिदारीमुळे आम्हाला आत्मनिर्भर, होण्यास मदत होईल तसेच जगात आमचा ठसा उमटविण्यासाठी आम्हाला संधी उपलब्ध करून देईल असेही त्यांनी नमूद केले.
गोयल यांनी उद्योजकांना दोन्ही देशांमधील तरुणांना अधिकाधिक नवीन तंत्रज्ञान वापरण्यास प्रोत्साहित करण्याच्या मार्गांवर अधिक लक्ष देण्याचे आणि परस्पर सहकार्य वाढविण्याचे आवाहन केले. भारत आणि सिंगापूर हे सायबर सुरक्षितता आणि आपत्ती निवारण, शिक्षण आणि कौशल्य विकास या क्षेत्रात एकत्र कार्य करत आहेत आणि हे असे स्तंभ आहेत जिथे आपण एकत्र काम करून सिंगापूरच्या अनुभवातुन शिकू शकू असे ते म्हणाले.
ई-कॉमर्स, फिन्टेक, कौशल्यपूर्ण उत्पादने, आरोग्य सुविधा या क्षेत्रांसाठी भारतात मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे. गोयल म्हणाले की, पंतप्रधान म्हणतात त्याप्रमाणे सिंगापूर हे आमच्यासाठी आसियान देशातील प्रेरक स्थान आहे.
सिंगापूर-भारत यांच्यातील संबंध हे लोकांच्या एकमेकांतील मोठ्या प्रमाणावर केलेल्या संपर्कातून वाढतील असे ते म्हणाले. यासाठी 'बुध्दिझम', 'बॉलीवूड' आणि 'बिझनेस' या तीन 'बी' वर भर दिला जाऊ शकतो असे ते म्हणाले.
S.Tupe/S.Patgaonkar/P.Malandkar
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1699129)
Visitor Counter : 234