अर्थ मंत्रालय

परदेशी संस्थात्मक गुंतवणुकदारांना स्थावर मालमत्ता गुंतवणूक ट्रस्ट आणि इनवीटचे सूचीबद्ध रोखे खरेदी करणे शक्य व्हावे यासाठी सुधारणा

प्रविष्टि तिथि: 11 FEB 2021 8:30PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 11 फेब्रुवारी 2021

स्थावर मालमत्ता गुंतवणूक ट्रस्ट आणि इनवीट यांचे सूचीबद्ध रोखे, परदेशी संस्थात्मक गुंतवणुकदारांना खरेदी करणे शक्य व्हावे यासाठी संबंधित कायद्यात योग्य त्या सुधारणा करण्याची घोषणा 2021-22 च्या अर्थसंकल्पीय भाषणात करण्यात आली होती. यामुळे स्थावर मालमत्ता गुंतवणूक ट्रस्ट  आणि इनवीटला सहज वित्त पुरवठा प्राप्त होणे शक्य होणार असून पायाभूत आणि स्थावर मालमत्ता क्षेत्रासाठीच्या  निधीमध्ये  भर पडणार आहे. या संदर्भात केंद्र सरकारचा  वित्त विधेयक 2021 अंतर्गत सिक्युरिटीज नियमन कायदा 1956 आणि प्रतिभूती आणि विनिमय मंडळ कायदा 1992 मध्ये सुधारणा  करण्याचा प्रस्ताव आहे.

याशिवाय वित्तीय संपत्तीचे पुनर्गठन आणि बँका आणि वित्तीय संस्थाना देय असलेल्या कर्जाची वसुली कायदा 1993 मध्येही सुधारणा करण्याचा प्रस्ताव आहे. याद्वारे गुंतवणूक साधने, वैकल्पिक गुंतवणूक कोश (एआयएफ, रीट आणि इनविट ) इत्यादींना कर्ज घेण्यासाठी आणि कर्ज रोखे जारी करण्यासाठी अधिकार प्राप्त होणार आहे.

 

M.Chopade/N.Chitale/P.Malandkar

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1697435) आगंतुक पटल : 217
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu , हिन्दी