वस्त्रोद्योग मंत्रालय

हातमाग विणकर आणि कारागीर यांच्या उत्पन्नवाढीला चालना देण्यासाठी केलेल्या  उपाययोजना

Posted On: 11 FEB 2021 6:04PM by PIB Mumbai

 

हातमाग विणकर आणि कारागीर यांच्या उत्पन्नवाढीला चालना देण्यासाठी भारत सरकारने खालील उपाययोजना सुरू केल्या आहेतः

खाली दिलेल्या माहितीनुसार विविध निर्यात परिषदांद्वारे आभासी पद्धतीने आंतरराष्ट्रीय मेळावे आयोजित करण्यात आले :

निर्यात परिषद                                                                                                                           

कार्यक्रम संख्या

हातमाग निर्यात चालना परिषद (HEPC)                                                                                             

07

हस्तोद्योग निर्यात चालना परिषद (EPCH)आणि कार्पेट निर्यात चालना परिषद   (CEPC)

09

पर्यटन मंत्रालयाने आयोजित केलेल्या भारत पर्व महोत्सवात एचईपीसी आणि ईपीसीएच या दोघांनी भाग घेतला. याशिवाय देशाच्या विविध भागात 66  विपणनविषयक  कार्यक्रमांना मंजुरी देण्यात आली आहे.

विणकाम आणि कारागीर समुदायाला अधिकाधिक जनाधार मिळवून देण्यासाठी   सर्व भागधारकांच्या सहकार्याने 6 व्या राष्ट्रीय हातमाग दिनी 9 नोव्हेंबर 2020 रोजी #Vocal4handmade  हे सोशल मीडिया अभियान सुरू करण्यात आले.

i) विणकरांसाठी असलेल्या विविध हातमाग योजनांच्या लाभाची माहिती देण्यासाठी  विणकरांकरिता  विविध राज्यात  534 चौपालांचे( गावातील छोट्या सभा ) आयोजन करण्यात आले .

ii) विविध स्रोतांच्या माध्यमातून विणकरांना उत्तम परतावा मिळावा यासाठी विविध राज्यांमध्ये  117 हातमाग आणि  46 हस्तोद्योग उत्पादक कंपन्या स्थापन करण्यात आल्या.

iii) हातमाग उत्पादनांच्या ई-मार्केटींगला प्रोत्साहन देण्यासाठी, 23 ई-कॉमर्स संस्था  या हातमाग उत्पादनांच्या ऑनलाईन मार्केटिंगसाठी कार्यरत आहेत.

iv) एन आय एफ टी अर्थात राष्ट्रीय फॅशन संस्थेच्या सहाय्याने दिल्ली, मुंबई, वाराणसी, अहमदाबाद, जयपूर, भुवनेश्वर आणि गुवाहाटीमधील विणकर सेवा केंद्रांमध्ये डिझाइन रिसोर्स सेंटर (डीआरसी) सुरू करण्यात आली  आहेत.

v) सरकारच्या ई मार्केट मंचावर (GeM) सुमारे 1.5 लाख विणकर आणि 30,000 कलाकारांना घेण्यात आले आहे, जेणेकरून विविध सरकारी विभागांमध्ये त्यांना आपल्या उत्पादनांची थेट विक्री करता येईल .

vi) हस्तकला आणि पर्यटन यांना एकाच वेळी चालना देण्यासाठी हस्तकला पर्यटन गावे मंजूर करण्यात आली आहेत. आतापर्यंत देशभरातली हातमाग आणि  हस्तोद्योग क्षेत्रातील अशी  12 गावे निश्चित करण्यात आली आहेत.

गेल्या  2 वर्षात आणि चालू वित्त वर्षात हातमागच्या निर्यातीचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

***

Jaydevi PS/S.Kakade/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1697150) Visitor Counter : 180


Read this release in: English , Tamil