आदिवासी विकास मंत्रालय
2021-22 वर्षासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात आदिवासी कल्याण मंत्रालयासाठी करण्यात आलेली 7524.87 कोटी रुपयांची तरतूद आतापर्यंतची सर्वाधिक तरतूद आहे-आर सुब्रह्मण्यम
प्रविष्टि तिथि:
10 FEB 2021 11:00PM by PIB Mumbai
2021-22 वर्षासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात आदिवासी कल्याण मंत्रालयासाठी 7524.87 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून गेल्या वर्षीच्या 5508 कोटी रुपयांच्या सुधारित अंदाजापेक्षा ती 36.62 टक्क्यांनी अधिक आहे. आदिवासी कल्याण मंत्रालयासाठी अर्थसंकल्पात करण्यात आलेल्या तरतुदींबाबत त्यांनी नवी दिल्लीत बातमीदारांना माहिती दिली. गेल्या पाच वर्षात मंत्रालयाच्या तरतुदीत सातत्याने वाढ झाली आहे आणि 2021-22 वर्षासाठी करण्यात आलेली तरतूद आतापर्यंतची सर्वाधिक तरतूद आहे असे ते म्हणाले. सुब्रह्मण्यम म्हणाले की अनुसूचित जमातीच्या कल्याणासाठी करण्यात आलेल्या तरतूदीतही यावर्षी मोठी वाढ केली आहे.2021-22 वर्षासाठी केंद्रीय अर्थसंकल्पात 41 मंत्रालय/ विभागांचा एसटीसी निधी म्हणून 78,256.31 कोटी रुपये तरतूद केली आहे. जी गेल्यावर्षीपेक्षा 50 टक्क्यांहून अधिक आहे. तर वित्त वर्ष 2014-15 च्या तरतुदीच्या तुलनेत चार पटीने वाढ केली आहे. आम्ही या मंत्रालयांबरोबर चर्चा करून निधीचा पूर्ण वापर होईल हे सुनिश्चित करू असे ते म्हणाले.


*****
M.Chopade/S.Kane/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1697019)
आगंतुक पटल : 182