रेल्वे मंत्रालय

शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला चालना देण्यासाठी किसान रेलद्वारे वाहतुकीसाठी अतिरिक्त वस्तू (मॅण्डरिन व हळद) यांचा अनुदानासाठी समावेश

Posted On: 10 FEB 2021 8:07PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 10 फेब्रुवारी 2021

 

किसान रेल द्वारे शेतमालाची वाहतूक करण्यासाठी शेतकर्‍यांना  प्रोत्साहन देण्यासाठी रेल्वे मंत्रालय व अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने ऑपरेशन ग्रीन - टॉप ते टोटल अंतर्गत भारतीय रेल्वेकडून प्रदान केल्या गेलेल्या कोणत्याही रेल्वे सेवा प्रकाराच्या माध्यमातून 50%  वाहतूक अनुदानासाठी पात्र फळे आणि भाजीपाल्याच्या यादीत मॅण्डरिन (संत्र्याचा प्रकार) आणि हळद (कच्ची) यांचा समावेश केला आहे.

आधीपासून अनुदान अंतर्गत पात्र वस्तू :

फळे- आंबा, केळी, पेरू, किवी, लिची, पपई, मोसंबी, संत्री, किनो, लिंबू, अननस, डाळिंब, फणस , सफरचंद, बदाम, आवळा, पॅशन फ्रुट आणि नासपती

भाज्या - फरसबी,  कारले,  वांगी, सिमला मिरची,  गाजर, फुलकोबी, मिरची (हिरवी), भेंडी, काकडी, मटार,  लसूण, कांदा, बटाटा आणि टोमॅटो.

देशाच्या एका कोपऱ्यातून  दुसर्‍या कोपऱ्यापर्यंत शेतमाल जलद वाहतुकीद्वारे लवकर पोहचून शेतकरी आणि ग्राहक दोघांना फायदा होईल हे किसान रेल सुनिश्चित करते.

 

* * *

S.Tupe/S.Kane/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1696895) Visitor Counter : 99


Read this release in: English , Urdu , Hindi