कंपनी व्यवहार मंत्रालय

4,73,131 भारतीय कंपन्या आणि 1,065 परदेशी कंपन्यांना कंपनी फ्रेश स्टार्ट स्कीम (सीएफएसएस, 2020) चा लाभ

Posted On: 09 FEB 2021 8:25PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 फेब्रुवारी 2021

कंपनी व्यवहार मंत्रालयाकडे उपलब्ध असलेल्या नोंदीनुसार, 4,73,131 भारतीय कंपन्यांनी आणि 1,065 परदेशी कंपन्यांनी त्यांचे प्रलंबित दस्तऐवज सादर करण्यासाठी कंपनीज  फ्रेश स्टार्ट स्कीम (सीएफएसएस)2020 चा लाभ  घेतला आहे.

केंद्रीय वित्त आणि कंपनी व्यवहार राज्यमंत्री अनुरागसिंग ठाकूर यांनी आज राज्यसभेत एका प्रश्नाच्या लेखी उत्तरात ही माहिती दिली.

कंपनी व्यवहार मंत्रालयाने दिनांक 30.03.2020 रोजी कंपनीज फ्रेश स्टार्ट स्कीम (सीएफएसएस) 2020, ही योजना सुरू केली. त्रुटींसंदर्भातील विवरणपत्र सादर करण्याची संधी या योजनेद्वारे देण्यात आली आहे.

विलंबित दस्तऐवज दाखल करण्यात झालेल्या  दिरंगाईबद्दल या योजनेअंतर्गत माफी दिली गेली आणि कागदपत्रे दाखल करण्यास उशीर झाल्यामुळे होणाऱ्या दंड आकारणीसंदर्भात खटला आणि कारवाईपासून संरक्षण दिले जाते. 1 एप्रिल ते  31 डिसेंबर, 2020 या कालावधीत एमसीए 21 - रजिस्ट्रीमध्ये भरण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे, विवरणपत्रे  इत्यादी भरण्यासाठी झालेल्या विलंबाबाबत कोणतेही अतिरिक्त शुल्क आकारले गेले  नाही.

राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनुसार लाभ घेतलेल्या कंपन्यांची संख्या-  Annexure- A

 

 

S.Tupe/S.Kulkarni/P.Malandkar

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1696617) Visitor Counter : 143


Read this release in: English , Punjabi