नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय

नवीकरणीय ऊर्जा क्षेत्राच्या विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी 2021-22 अर्थसंकल्पात एसईसीआय आणि आयआरईडीएच्या भांडवलात वाढ


राष्ट्रीय हायड्रोजन अभियान प्रस्तावित

Posted On: 09 FEB 2021 6:25PM by PIB Mumbai

नवी दिल्ली, 9 फेब्रुवारी 2021

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी 2021-22 च्या अर्थसंकल्पीय भाषणात सौर ऊर्जा कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (एसईसीआय) आणि इंडियन रिन्यूएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सी लिमिटेड (आयआरईडीए) चे भांडवल वाढवण्याची घोषणा केली. त्या म्हणाल्याअपारंपरिक उर्जा क्षेत्राला आणखी चालना देण्यासाठी मी सौर ऊर्जा महामंडळाला 1,000 कोटी रुपये आणि आयआरईडीएला 1,500 कोटी रुपये अतिरिक्त भांडवल देण्याचा प्रस्ताव ठेवला आहे.

31.12.2020 रोजी देशात स्थापित एकत्रित क्षमता 91,000 मेगावॅट आहे आणि आणखी 50,000  मेगावॅट प्रकल्पांची अंमलबजावणी सुरू आहे ज्यामध्ये एसईसीआयचा वाटा 54% आहे. नवीकरणीय ऊर्जा  क्षेत्राला आणखी चालना देण्यासाठी एसईसीआयला एक हजार कोटी रुपये अतिरिक्त भांडवलाचा पुरवठा करण्यात आला आहे ज्यामुळे एसईसीआय वर्षाकाठी 15,000 मेगावॅटच्या निविदा काढू शकेल.

अर्थसंकल्प 2021-22 च्या भाषणात हरित उर्जा स्त्रोतांमधून हायड्रोजन निर्माण करण्यासाठी राष्ट्रीय हायड्रोजन मिशन सुरू करण्याचा प्रस्ताव अर्थमंत्र्यांनी मांडला.

प्रस्तावित राष्ट्रीय हायड्रोजन ऊर्जा मिशनचे लक्ष्य  हायड्रोजन ऊर्जेसाठी केंद्र सरकारची संकल्पना, हेतू आणि दिशा ठरवणे आणि ते साकार करण्यासाठी धोरण आणि दृष्टीकोन सुचवणे हे आहे. मिशन अल्पावधीसाठी विशिष्ट धोरण (4 वर्षे), आणि दीर्घ मुदतीसाठी (10 वर्षे आणि त्याहून अधिक) व्यापक तत्वे निश्चित करेल. भारताला  हायड्रोजन निर्मिती आणि इंधन सेल्स तंत्रज्ञानाचे जागतिक केंद्र म्हणून विकसित करण्याचे उद्दीष्ट आहे.

 

S.Tupe/S.Kane/P.Malandkar

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1696555) Visitor Counter : 246


Read this release in: English , Urdu , Hindi