कार्मिक, सार्वजनिक तक्रार आणि निवृत्ती वेतन मंत्रालय

सरकारने दिव्यांग वारसांना मिळणाऱ्या कुटुंब निवृत्तीवेतनाचे नियम शिथिल केले

Posted On: 08 FEB 2021 8:01PM by PIB Mumbai

 

सरकारी कर्मचारी आणि निवृत्तीवेतन धारकाच्या मृत्युनंतर त्याचे अपत्य अथवा भावंडाला कुटुंब निवृत्तीवेतनासाठी लागू होणाऱ्या सीसीएस (निवृत्तीवेतन) नियम 1972 मधील उत्पन्नविषयक पात्रता अटी शिथिल करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. दिव्यांग वारसांना अधिक वैद्यकीय सुविधा आणि आर्थिक मदतीची गरज असते हे लक्षात घेऊन सरकारने ही सूट दिली आहे. कुटुंब निवृत्तीवेतनासाठी पात्र ठरण्यासाठी इतर कुटुंब सदस्यांना लागू होणाऱ्या उत्पन्नविषयक अटी दिव्यांगता असणाऱ्या अपत्याला किंवा भावंडाला लागू होऊ शकत नाहीत असा सरकारचा दृष्टीकोन आहे. म्हणून सरकारने दिव्यांगता असणाऱ्या अपत्याचा किंवा भावंडाचा विचार करून, कुटुंब निवृत्तीवेतनासाठी आवश्यक असलेल्या उत्पन्नविषयक पात्रता अटींचा आढावा घेतला आणि अशा वारसांच्या उत्पन्नाची मर्यादा त्यांच्या गरजांशी सुसंगत असेल अशा प्रकारे निवृत्तीवेतनासाठी रक्कम निश्चित केली.

त्यानुसार, निवृत्तीवेतन आणि निवृत्तीवेतनधारक कल्याण विभागाने 8 फेब्रुवारी 2021 ला आवश्यक सूचना/ आदेश जारी केले. सरकारी नोकर अथवा निवृत्तीधारक याच्या मानसिक किंवा शारीरिक दिव्यांगता असणाऱ्या वारसाचे कुटुंब निवृत्तीवेतनाव्यतिरिक्तचे एकूण उत्पन जर सरकारी नोकर अथवा निवृत्तीधारकाच्या अखेरच्या वेतनाच्या 30% पेक्षा कमी असेल तर तो/ती कुटुंब निवृत्ती वेतन मिळण्यास पात्र असेल.

 

अधिक माहितीसाठी इथे क्लिक करा:

***

S.Thakur/S.Chitnis/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai@gmail.com(Release ID: 1696295) Visitor Counter : 9


Read this release in: English , Urdu , Hindi , Bengali