श्रम आणि रोजगार मंत्रालय

अखिल भारतीय स्थलांतरीत कामगार सर्वेक्षण

Posted On: 08 FEB 2021 7:51PM by PIB Mumbai

 

केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्रालयाचे संलग्न कार्यालय असलेल्या  कामगार मंडळाकडे अखिल भारतीय पातळीवरील स्थलांतरित कामगारांचे सर्वेक्षण करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. 

कामगार मंडळाद्वारे घेण्यात येणाऱ्या या सर्वेक्षणाच्या वेळापत्रकाचे परीक्षण करून त्याला अंतिम स्वरूप देणे, नमुन्याचे आरेखन आणि इतर तंत्रज्ञानविषयक तपशील निश्चित करणे यासाठी भारत सरकारने 9 सप्टेंबर 2020 रोजी तज्ज्ञ गटाची स्थापना केली आहे.

केंद्रीय कामगार आणि रोजगार राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) संतोष कुमार गंगवार यांनी आज लोकसभेत एका लेखी उत्तरात ही माहिती दिली.

***

S.Thakur/S.Chitnis/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1696285) अभ्यागत कक्ष : 169
Read this releasein: English , Urdu , Manipuri