पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय

कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्रकल्प

प्रविष्टि तिथि: 08 FEB 2021 6:20PM by PIB Mumbai

 

पशुपालनातील व सागरातील टाकाऊ पदार्थांसह जंगल आणि शेतीतील टाकाऊ पदार्थ यासारख्या रासायनिक तसेच जैविक टाकाऊ पदार्थांचे परिणामकारक व्यवस्थापन करून वाहतुकीसाठी पर्यायी हरित इंधन म्हणून कॉम्प्रेस्ड बायोगॅसला प्रोत्साहन देण्यासाठी सरकारने किफायतशीर वाहतुकीसाठी पर्यायी शाश्वत उपक्रम (सतत) 1.10.2018 रोजी सुरू केला. या उपक्रमात खासगी उद्योजकांकडून मोठ्या संख्येने कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्रकल्प स्थापनेची कल्पना आहे. सतत योजनेचा एक भाग म्हणून, तेल आणि गॅस विपणन कंपन्या दीर्घ मुदतीच्या आधारावर कॉम्प्रेस्ड बायोगॅस खरेदीसाठी एक्सप्रेशन ऑफ इंटरेस्ट (ईओआय) ला आमंत्रित करीत आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) कर्ज वितरणासाठी कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्रकल्पांचा प्राधान्य यादीत समावेश केला आहे.

 

अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा

 

M.Chopade/V.Joshi/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(रिलीज़ आईडी: 1696256) आगंतुक पटल : 203
इस विज्ञप्ति को इन भाषाओं में पढ़ें: English , Urdu