कौशल्य विकास आणि उद्यमशीलता मंत्रालय

राष्ट्रीय कौशल्य विकास अभियानाचे लाभार्थी

Posted On: 05 FEB 2021 9:34PM by PIB Mumbai

 

कौशल्य प्राप्त करण्यासाठी तसेच कौशल्य प्रशिक्षण उपक्रमांच्या बाबतीत क्षेत्रे आणि राज्यांमध्ये एककेंद्राभिमुखता निर्माण करण्यासाठी 15.07.2015 रोजी पंतप्रधानांनी राष्ट्रीय कौशल्य विकास अभियान (एनएसडीएम) सुरू केले. प्रशिक्षण केवळ केंद्रीय मंत्रालये आणि विभागच नव्हे तर राज्य सरकारांकडून देखील दिले जाते. उद्योग / नियोक्तेदेखील त्यांच्या आवारात प्रशिक्षण देतात. देशातील तरुणांना कौशल्य प्रशिक्षण देण्यासाठी 20 हून अधिक केंद्रीय मंत्रालये / विभाग योजना/ कार्यक्रम राबवित आहेत. कौशल्य विकास व उद्योजकता मंत्रालय (एमएसडीई) अल्पकालीन कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रमात जन शिक्षण संस्थान (जेएसएस) आणि नॅशनल अप्रेंटिसशिप प्रमोशन स्कीम (एनएपीएस) याशिवाय शिल्पकला प्रशिक्षण योजनेंतर्गत औद्योगिक प्रशिक्षण संस्थांच्या (आयटीआय) मार्फत दीर्घकालीन प्रशिक्षणाव्यतिरिक्त प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना (पीएमकेव्हीवाय) ही महत्वाकांक्षी योजना देशभरात राबवित आहे. मंत्रालयाच्या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत सन 2016-17 ते 2019-20 या कालावधीत प्रशिक्षण घेतलेल्या व्यक्तींची संख्या खाली दिली आहे:

 

Sl. No.

Schemes

Year-wise beneficiaries (in lakh)

Total

(in lakh)

 

2016-17

2017-18

2018-19

2019-20

1.

PMKVY + Fee based training of NSDC

22.37

49.27

43.61

70.13

185.38

2.

JSS

2.14

1.72

1.67

4.15

9.68

3.

NAPS

1.11

1.61

1.99

2.54

7.25

4.

CTS

11.91

12.13

14.52

13.48

52.04

Total

37.53

64.73

61.79

90.30

254.35

उप-अभियान हे राष्ट्रीय कौशल्य विकास अभियानाचा भाग आहेत. माननीय पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली एनएसडीएमच्या गव्हर्निंग कौन्सिलकडे आवश्यकतेनुसार उच्च प्राथमिकता क्षेत्रात उप-अभियान ओळखण्याचे अधिकार आहेत. (i) संस्थात्मक प्रशिक्षण; (ii) पायाभूत सुविधा; (iii) एककेंद्राभिमुखता; (iv) प्रशिक्षक; (v) परदेशी रोजगार; (vi) शाश्वत उदरनिर्वाह, आणि (vii) सार्वजनिक पायाभूत सुविधांचा लाभ ही सात उप अभियाने मंजूर झाली आहेत. एनएसडीएमच्या कार्यकारी समितीद्वारे एमएसडीईच्या सचिवांच्या अध्यक्षतेखाली प्रत्येक उप-अभियानासंदर्भातील काम आणि प्रगतीची देखरेख केली जाते. केंद्रीय कौशल्य विकास व उद्योजकता राज्यमंत्री राज कुमार सिंह यांनी आज राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली.

****

S.Tupe/V.Joshi/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com


(Release ID: 1695680) Visitor Counter : 121


Read this release in: English , Urdu , Manipuri