सुक्ष्म, लघु आणि मध्यम उदयोग मंत्रालय
मन की बात मध्ये पंतप्रधानांनी केलेल्या उल्लेखानंतर लोकांचा तवांगमधील हस्तनिर्मित कागदाला उदार आश्रय
प्रविष्टि तिथि:
04 FEB 2021 8:45PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 4 फेब्रुवारी 2021
एक हजार वर्षे प्राचीन पंरपरागत मोन्पा हस्तनिर्मित कागद म्हणजेच मोन्पा हा पंतप्रधानांनी मन की बात मध्ये केलेल्या विशेष उल्लेखानंतर चांगलाच प्रकाशात आला आहे. खादी आणि ग्रामोद्योग आयोगाने अरुणाचल प्रदेशातील तवांगमधील या प्राचीन कलेचे पुनरुज्जीवन करून 25 डिसेंबर 2020 पासून हा हस्तनिर्मित कागद त्यांच्या www.khadiindia.gov.in या इ-पोर्टलद्वारे विक्रिला उपलब्ध करून दिला.

त्या पहिल्याच दिवशी 100 मोन्पा हस्तनिर्मित कागदांची विक्री झाली. महाराष्ट्र व उत्तरप्रदेशातून या कागदाला सर्वाधिक मागणी होती. पंतप्रधानांनी या प्राचीन कलेचा उल्लेख केल्यानंतर तवांगमध्ये प्रशिक्षित स्थानिक कारागिरांनी हातानी तयार केलेले हस्तनिर्मित कागद रविवारी 31 जानेवारीला ऑनलाईन विक्रीसाठी ठेवले गेले. मोन्पा हस्तनिर्मित कागद फक्त पर्यावरण रक्षणासाठीच नाही तर स्थानिक कारागिरांना उत्पन्नाचे नवे मार्ग खुले करण्यासाठीही उपयुंक्त आहे. 24 इंच लांबी 16 रुंदी असलेल्या एका हस्तनिर्मित कागदाची किंमत 50 रुपये आहे.
खादी व ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष विनयकुमार सक्सेना यांनी मोन्पा हस्तनिर्मित कागदाचे धार्मिक व सांस्कृतिक महत्व सांगून भारत व भारताबाहेरही या कागदाला मोठी बाजारपेठ होती असे सांगितले.
एकेकाळी मोन्पा हस्तनिर्मित कागद तवांगमधील घराघरात तयार केला जात होता आणि तिबेट, भुतान, म्यानमार व जपान यासारख्या देशांमध्ये निर्यातही होत होता म्हणूनच या कलाप्रकाराच्या पुनरुज्जीवनाला महत्व आहे.
तवांगमध्ये वाढणाऱ्या शुंगु शेंग या झाडाच्या सालीपासून हा मोन्पा हस्तनिर्मित कागद तयार केला जातो व तो आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अश्या अर्धपारदर्शक तंतूमय पोतासाठी ओळखला जातो.
बुद्धधर्मातील पोथ्या ,ग्रंथ , हस्तलेख यांच्या लिखाणासाठी व प्रार्थनाध्वज तयार करण्यासाठी मोम्पा हस्तनिर्मित कागदाचा वापर केला जात असतो.
* * *
Jaydevi PS/V.Sahajrao/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1695290)
आगंतुक पटल : 263