दूरसंचार आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय

22 मार्च रोजी मुख्य पोस्टमास्टर जनरल-महाराष्ट्र सर्कलच्या कार्यालयात 48व्या पोस्टल पेन्शन अदालत चे आयोजन


तक्रार अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत 26 फेब्रुवारी 2021

Posted On: 03 FEB 2021 3:48PM by PIB Mumbai

 

मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई यांच्या वतीने टपाल विभागाच्या निवृत्तीवेतनधारकांसाठी/कुटुंब निवृत्ती वेतन धारकांसाठी 48 वी पेन्शन अदालत आयोजित करण्यात आली आहे. मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई येथील कार्यालयात 23 मार्च 2021 रोजी सकाळी अकरा वाजता ही पेन्शन अदालत होणार आहे.

टपाल विभागातून निवृत्त झालेल्या किंवा सेवेत असताना मृत्यू झालेल्या, महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील टपाल विभागातील निवृत्तीवेतन धारकांच्या लाभांशी संबंधित तक्रारी, ज्यांचा तीन महिन्यांच्या कालावधीत निपटारा करण्यात आलेला नाही अशा प्रकरणांचा या पेन्शन अदालत मध्ये विचार केला जाईल.

कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर उद्भवलेल्या परिस्थितीमुळे या पेन्शन अदालतला प्रत्यक्ष उपस्थित राहणं टाळावे.

निवृत्तीवेतन धारकांनी आपल्या तक्रार अर्जाच्या तीन प्रती 26 फेब्रुवारी 2021 रोजी किंवा त्यापूर्वी वैयक्तिक स्वरूपात पुढील पत्त्यावर पाठवाव्यात.

प्रति : एस यु पानतावणे, वरिष्ठ लेखा अधिकारी/सचिव पेन्शन अदालत, मुख्य पोस्टमास्तर जनरल कार्यालय, महाराष्ट्र सर्कल, मुंबई जीपीओ भवन, दुसरा मजला, मुंबई 400001. 26 फेब्रुवारी 2021 नंतर मिळालेल्या अर्जांवर पेन्शन अदालत मध्ये विचार केला जाणार नाही.

डाक पेन्शन अदालतच्या अर्जाचा नमुना पुढील प्रमाणे

SR.No.

SUBJECT

DETAILS TO BE FILLED IN BY THE INDIVIDUAL/ PENSIONER

1.

Name of the pensioner /Family pensioner with Designation at the time of retirement/death

 

2.

Name of Post Office from where retired etc. and date of retirement

 

3

PPO No.

 

 

4

Name of the Post Office from where Pension is being drawn 

 

5

Postal address of the pensioner

with phone no.

 

6

Complaint in brief (Attach application containing details if required)

 

7

Date & signature of the Individual/Pensioner.

 

          

Jaydevi PS/S.Tupe/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1694751) Visitor Counter : 98


Read this release in: English