ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक पुरवठा मंत्रालय

खोटी जाहिरात

Posted On: 02 FEB 2021 9:53PM by PIB Mumbai

 

ग्राहक संरक्षण कायदा, 2019 (सीपी कायदा) च्या कलम 10 अंतर्गत 24 जुलै 2020 रोजी केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणची (सीसीपीए) स्थापना करण्यात आली. ग्राहकांच्या हक्कांचे उल्लंघन, चुकीच्या व्यापार पद्धती आणि  खोट्या किंवा दिशाभूल करणार्या जाहिराती आणि एक वर्ग म्हणून ग्राहकांच्या हक्कांना प्रोत्साहन, संरक्षण आणि अंमलबजावणी करण्या संबधित बाबी नियमित करण्यासाठी या प्राधिकरणाची स्थापना करण्यात आली. 

आतापर्यंत सीसीपीएने रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे, कोविड-19 विषाणूपासून संरक्षण इत्यादी असे दिशाभूल करणारे दावे करणाऱ्या वॉटर प्युरीफायर, रंग, फ्लोर क्लीनर, परिधान, जंतुनाशक, फर्निचर यासारख्या विविध क्षेत्रातील 14 कंपन्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे तसेच ग्राहक संरक्षण कायद्यातील तरतुदींवर प्रकाश टाकत आणि सक्षम आणि विश्वासार्ह वैज्ञानिक सल्ल्याद्वारे समर्थित नसलेल्या कोरोना विषाणूविरूद्ध परिणामकारकतेबद्दल खोटे दावा करणे थांबवण्यासाठी उद्योग संघटनांना आणि त्यांच्या सदस्यांना एक सल्ले-सूचना जारी केल्या आहेत. 

केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण राज्यमंत्री  रावसाहेब दानवे यांनी आज लोकसभेत ही माहिती दिली.

 

M.Chopade/S.Mhatre/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1694605) Visitor Counter : 93


Read this release in: English , Urdu