रेल्वे मंत्रालय

भारतीय रेल्वेच्या वतीने जवळपास 18 मार्गांवर किसान रेल सेवा

Posted On: 29 JAN 2021 7:15PM by PIB Mumbai

नवी दिल्‍ली, 29 जानेवारी 2021


केंद्रीय अर्थसंकल्प 2020-21 मध्ये करण्यात आलेल्या घोषणेनुसार भारतीय रेल्वेच्या वतीने दूध, मांस आणि मासे यांच्यासह इतर नाशवंत पदार्थ आणि कृषी उत्पादनांच्या वाहतुकीसाठी किसान रेल्वे सेवा सुरू केली आहे.

बहुवस्तू, बहुमालवाहू, उपभोक्ता, बहु-लोडिंग आणि अनलोडिंग वाहतूक या किसान रेल सेवेमुळे होत आहे. यामुळे शेतकरी बांधवांना मोठ्या प्रमाणावर बाजारपेठ उपलब्ध होत आहे.

उत्पादन केंद्रे आणि बाजारपेठ यांचा मेळ घालून उपभोक्त्यापर्यंत नाशवंत उत्पादने शक्य तितक्या कमी कालावधीत पोहोचवता यावीत आणि कृषी क्षेत्राचे उत्पन्न वाढविता यावे, असे प्राथमिक उद्दिष्ट निश्चित करून किसान रेल सेवा सुरू करण्यात आली आहे. किसान रेल सेवा सुरू करण्यासाठी कृषी मंत्रालय, राज्य सरकारे आणि स्थानिक संस्था यांच्यासह रेल्वेच्या विविध भागधारकांच्या सक्रिय पाठिंब्यामुळे किसान रेल्वे सेवा सुरू झाली आहे. या क्षेत्रातल्या सहभागीतांकडून आलेल्या मागण्या, त्यांच्या आवश्यकता यांच्याविषयी आलेले अभिप्राय यांच्या आधारे भारतीय रेल्वेने आत्तापर्यंत विविध अठरा मार्गांवर किसान रेल सेवा सुरू केली आहे. दि.7.08.2020 रोजी महाराष्ट्रातल्या देवळाली ते बिहारमधल्या दानापूर या मार्गावर पहिल्या किसान रेल्वेचा हिरवा झेंडा दाखवला होता.

किसान रेल गाड्यांसाठी वेळापत्रक तयार करण्यात आले असून त्यानुसार त्यांचे मार्गही निश्चित करण्यात आले आहेत. त्यामुळे त्या मार्गावरील इतर गाड्यांना विलंब होणार नाही, याची दक्षता घेतली जात आहे. किसान रेल सेवा आत्तापर्यंत 18 मार्गांवर सुरू करण्यात आली आहे. 22 जानेवारीपर्यंत 157 सेवा किसान रेलच्या माध्यमातून देण्यात आल्या असून 49,000 टनांपेक्षाही जास्त कृषी मालाची वाहतूक करण्यात आली आहे. आत्तापर्यंत ज्या मार्गांवर किसान रेल सेवा सुरू झाली आहे, त्या मार्गांचा तपशील खालीलप्रमाणे आहे.

Route No

From – To

Date of
Inauguration

1

Devlali to Danapur

(now Sangola to Muzaffarpur)

07-08-2020

2

Anantpur to Adarshnagar, Delhi 

09-09-2020

3

Yeshwantpur to Nizamuddin 

19-09-2020

4

Nagpur to Adarshnagar, Delhi

14-10-2020

5

Chhindwara to Howrah/New Tinsukia

28-10-2020

6

Sangola to Howrah  (via Secunderabad)

29-10-2020

7

Sangola to Shalimar

21-11-2020

8

Indore to New Guwahati

24-11-2020

9

Ratlam to New Guwahati

05-12-2020

10

Indore to Agartala

27-12-2020

11

Jalandhar to Jirania

31-12-2020

12

Nagarsol to New Guwahati

05-01-2021

13

Nagarsol to Chitpur

07-01-2021

14

Nagarsol to New Jalpaiguri

10-01-2021

15

Nagarsol to Naugachia

11-01-2021

16

Nagarsol to Fatuha

13-01-2021

17

Nagarsol to Baihata

19-01-2021

18

Nagarsol to Malda Town

20-01-2021

* * *

M.Chopade/S.Bedekar/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com(Release ID: 1693359) Visitor Counter : 204


Read this release in: English , Urdu , Hindi