नौवहन मंत्रालय
गुजरातमधील, कच्छ येथील धोर्डो येथे दिनांक 21 ते 23 जानेवारी 2021 दरम्यान होणार 'चिंतन बैठक'
प्रविष्टि तिथि:
20 JAN 2021 7:15PM by PIB Mumbai
नवी दिल्ली, 20 जानेवारी 2021
केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलमार्ग मंत्री (स्वतंत्र प्रभार) मनसुख मांडवीय यांच्या अध्यक्षतेखाली गुजरातमधील कच्छ येथील धोर्डो येथे तीन दिवसीय बंदर आढावा बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला चिंतन बैठक असे नाव देण्यात आले आहे.
दिनांक 21 ते 23 जानेवारी 2021या कालावधीत होणाऱ्या या बैठकीला भारतातील सर्व प्रमुख बंदरांचे अध्यक्ष आणि मंत्रालयातील वरीष्ठ अधिकारी उपस्थित राहतील आणि विस्तृत विचारमंथन परीषदेत मेरीटाईम व्हिजन 2030 याच्या कृती आराखड्याला अंतिम रुप देण्यात येईल.
या चिंतन बैठकीत शहरातील वाहतुकीचे नवे आयाम शोधण्यासाठी विविध सत्रे, एसएआरओडी बंदरांसाठी प्रभावी अंमलबजावणी, आंतरराष्ट्रीय लवादांशी संबंधित मुद्द्यांचा समावेश आहे. सर्व प्रमुख बंदरांद्वारे सॅटेलाईट बंदरांच्या विकासासाठी भविष्यकालीन कृती आराखडा यावर विशेष भर दिला जाईल.
केंद्रीय बंदरे,नौवहन आणि जलमार्ग मंत्री (स्वतंत्र प्रभार) मनसुख मांडवीय यांनी सांगितले, की ही चिंतन बैठक आयोजित करण्याचा मूलभूत उद्देश आपल्या प्रमुख बंदरांची कार्यक्षमता आणि कामगिरी सुधारण्यासाठी निरनिराळ्या संकल्पना विकसित करुन जागतिक दर्जाच्या उत्तम पायाभूत सुविधा उपलब्ध करुन देणे हा आहे. पंतप्रधानांच्या आत्मनिर्भर भारताचे उद्दिष्ट साकार करण्यासाठी या चिंतन बैठकीतील विचारमंथनातून पुढे आलेल्या संकल्पना मेरीटाईम-2030 व्हिजनमधे जोडल्या जातील, असेही मांडवीय यांनी सांगितले
* * *
S.Tupe/S.Patgaonkar/D.Rane
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा:
@PIBMumbai
/PIBMumbai
/pibmumbai
pibmumbai[at]gmail[dot]com
(रिलीज़ आईडी: 1690509)
आगंतुक पटल : 220