माहिती आणि प्रसारण मंत्रालय

इफ्फी-51 मध्ये अनेक नवोदित चित्रपट निर्माते-दिग्दर्शक


इफ्फी-51 मध्ये माहितीपटांची संख्या कमी आणि लघुपट तुलनेने अधिक; माहितीपट अत्यंत महत्वाचे माध्यम : हौबम पबन कुमार

Posted On: 17 JAN 2021 5:04PM by PIB Mumbai

पणजी, 17 जानेवारी 2021
 

51 वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव-इफ्फी सध्या गोव्यात सुरु असून आज पहिल्या दिवशी भारतीय पॅनोरामाच्या ज्युरी समितीच्या सदस्यांची पत्रकार परिषद झाली. फिचर फिल्म्स, विभागाचे अध्यक्ष जॉन मॅथ्यू मॅथन, बिगर फिचर फिल्म समितीचे अध्यक्ष हौबम पबन कुमार, फिचर फिल्म ज्युरी समितीच्या सदस्य जादूमोनी दत्ता यांच्यासह इतर ज्युरी सदस्य या पत्रपरिषदेला उपस्थित होते.

“आलेल्या प्रवेशिकांमधून महोत्सवासाठी चित्रपटांची निवड करणे हे सर्व ज्युरी सदस्यांसाठी मोठे आव्हान होते. मात्र कुठलाही वादविवाद न होता आम्ही एकमताने ही निवड केली.” अशी माहिती जॉन मॅथ्यू मॅथन यांनी दिली.

फिचर फिल्म च्या ज्युरी समितीत 12 सदस्य असून ते सर्व उत्तम चित्रपट निर्माते, दिग्दर्शक तर आहेतच शिवाय विविध चित्रपट विषयक संस्था आणि व्यवसायांमध्ये त्यांचे महत्वाचे स्थान आहे. हे सगळे जण मिळून भारतीय चित्रपटांमधील विविधरंगी पैलूंचे एकत्रित रूप आहेत.

बिगर-फिचर फिल्म गटात आलेल्या प्रवेशिकांविषयी बोलतांना दिग्दर्शक आणि बिगर फिचर फिल्म समितीचे अध्यक्ष हौबम पबन कुमार यांनी सांगितले, “आधीच्या वर्षांच्या तुलनेत, यंदाच्या महोत्सवात अगदी कमी माहितीपट आले आहेत.लघुपटांच्या तुलनेत माहितीपटांची  संख्या कमी आहे.” बिगर फिचर फिल्म विभागाला माहितीपट आणि लघुपट विभाग असे म्हटले जावे अशी सूचना करतानाचा,  हौबम पबन कुमार यांनी एक माध्यम म्हणून माहितीपटांचे महत्व सांगितले.

यंदाच्या महोत्सवात अनेक युवा चित्रपट निर्माते आहेत. “यंदा 60 ते 70 पेक्षा अधिक युवा चित्रपट निर्माते आहेत, ही स्वागतार्ह बाब आहे. या विभागातील पहिला सिनेमा ‘सांड की आंख’ देखील युवा चित्रपट निर्मात्याने बनवला आहे.” असे कुमार म्हणाले.

तुषार हिरानंदानी निर्मित सांड की आंख चित्रपटाची उद्घाटनाचा चित्रपट म्हणून निवड करण्यामागचे कारण विचारले असता, त्यांनी सांगितले की या चित्रपटात असे अनेक पैलू आहेत, जे ज्युरी सदस्यांना विशेष भावले.

चित्रपटनिर्मात्या आणि पत्रकार तसेच, ज्युरी सदस्य संघमित्रा चौधरी, यांनी यंदाच्या ईफ्फीमध्ये आलेल्या  नवोदित दिग्ददर्शकांनी त्यांच्या चित्रपटांसाठी घेतलेल्या परिश्रमांचे कौतुक केले. या सर्वांनी आपल्या चित्रपटातून समकालीन विश्व मांडले आहे, असे त्या म्हणाल्या.

इंडियन पॅनोरामाच्या बिगर फिचर फिल्म गटात, अंकित कोठारी यांचा  ‘पंछिका’ हा गुजराती चित्रपट, उद्घाटनाचा चित्रपट आहे.

भारतीय पॅनोरामाच्या फिचर फिल्म विभागाच्या ज्युरी समितीचे सदस्य पुढीलप्रमाणे :

  1. डॉमनिक संगमा, चित्रपट निर्माते आणि पटकथा लेखक
  2. जादूमणी दत्ता , चित्रपट निर्मात्या, लेखिका आणि पटकथा लेखिका
  3. कला मास्तर , नृत्यदिग्दर्शक
  4. कुमार सोहोनी, चित्रपट निर्माते आणि लेखक
  5. रमा वीज – अभिनेत्री आणि निर्माती
  6. राममूर्ती बी, चित्रपट निर्माते
  7. संघमित्रा चौधरी –चित्रपट निर्मात्या आणि पत्रकार
  8. संजय पूर्ण सिंग चौहान, चित्रपट निर्माते,
  9. सतिन्द्र मोहन –चित्रपट समीक्षक आणि निर्माते.
  10. सुधाकर वसंता - चित्रपट निर्माते.
  11. टी प्रसन्न कुमार, चित्रपट निर्माते.
  12. यु राधाकृष्णन – माजी सचिव, FFSI

 

भारतीय पॅनोरामाच्या बिगर फिचर फिल्म विभागाच्या ज्युरी समितीचे सदस्य पुढीलप्रमाणे:

  1. अतुल गंगवार, दिग्दर्शक, पटकथा लेखक आणि
  2. ज्वांगदाओ बोडोसा , चित्रपट निर्माते.
  3. मंदार तालुकदार, चित्रपट निर्माते
  4. सज्जन बाबू, चित्रपट निर्माते
  5. सतीश पांडे, निर्माते-दिग्दर्शक
  6. वैजयंती आपटे –पटकथा लेखिका आणि निर्मात्या

 

 

* * *

M.Chopade/R.Aghor/D.Rane

 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1689388) Visitor Counter : 172


Read this release in: English , Urdu , Hindi