अर्थ मंत्रालय
कर्ज देणारे अनधिकृत डिजिटल मंच/मोबाईल ॲप्स विरुध्द आरबीआयचा सावधानतेचा इशारा
Posted On:
25 DEC 2020 2:10PM by PIB Mumbai
जलद व विना अडचण कर्जे मिळण्याची वचने देणा-या, अनधिकृत डिजिटल मंचांना/मोबाईल ॲप्सना, व्यक्ती/छोटे उट्योग वाढत्या प्रमाणावर बळी पडत असल्याचे रिपोर्ट येत आहेत. ह्या रिपोर्टस मध्ये, कर्जदरांकडून अत्याधिक व्याज दर व छुपे आकार मागण्यात येत असून, कर्ज वसुलीसाठी अस्वीकार्य व दडपशाहीच्या रीती अनुसरण्यात येत असल्याचे, आणि कर्जदारांच्या मोबाईल फोन्सवरील डेटा मिळविण्यासाठी कराराचा गैरवापर केला जात असल्याचेही संदर्भ मिळत आहेत.
आरबीआयकड़े पंजीकृत केल्या गेलेल्या बँका, अबँकीय वित्तीय कंपन्या (एनबीएफसी) आणि संबंधित राज्यांच्या कर्ज देण्याबाबतच्या अधिनियमासारख्या वैधानिक तरतुदी खाली राज्य सरकार कडून विनियमित केल्या गेलेल्या इतर संस्था कर्ज देण्याच्या कायदेशीर कार्यकृती करु शकतात. जनतेला येथे सावधानतेचा इशारा देण्यात येत आहे, की त्यांनी अशा बेकायदेशीर कार्यकृतींना बळी पडू नये आणि ऑनलाईन/मोबाईल ॲप्स द्वारा कर्जे देऊ करणा-या कंपन्या/संस्थांचा खरेपणा/पूर्वेतिहास पडताळून पहावा, ह्याशिवाय, ग्राहकांनी त्यांच्या केवायसी कागदपत्रांच्या प्रती अज्ञात व्यक्ती, सत्यांकन न केलेल्या अनधिकृत ॲप्स बरोबर कधीही शेअर करु नयेत आणि असे ॲप्स/ ॲप्सशी संबंधित बँक खात्यांची माहिती, संबधित कायदा अंमलबजावणी एजन्सीजना कळवावी किंवा ऑनलाईन तक्रार दाखल करण्यासाठी सचेत पोर्टलचा (https://sachet.rbi.org.in ) उपयोग करावा.
रिझर्व्ह बँकेने मॅडेट दिले आहे की, बँका व एनबीएफसींच्या वतीने वापरण्यात येणा-या डिजिटल कर्जदायी प्लॅटफॉर्म्स नी, त्यांच्या ग्राहकांना बँक बँकांची किंवा एनबीएफसीर्ची नावे सुरुवातीलाच सांगावीत. रिझर्व्ह बँकेकडे पंजीकृत केलेल्या एनबीएफसीची नावे व पत्ते येथे ऍक्सेस केले जाऊ शकतात. आणि आरबीआय कडून विनियमित करण्यात आलेल्या संस्थांच्या विरुध्दच्या तक्रारी दाखल करण्यासाठीचे पोर्टल, https://cms.rbi.org.in मार्फत ऍक्सेस केले जाऊ शकते
M.Chopade/RBI/P.Kor
***
सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai /PIBMumbai /pibmumbai pibmumbai[at]gmail[dot]com
(Release ID: 1683569)
Visitor Counter : 179