माहिती आणि प्रसारण मंत्रालय

राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाने मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चर यांच्याकडून घेतले दुर्मिळ 16 मिमिचे छायाचित्रण

Posted On: 10 DEC 2020 10:22PM by PIB Mumbai

 

राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाने मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चर (MCCIA) यांच्याकडून दुर्मिळ असे 16 मिमिचे छायाचित्रण घेतले आहे.

आज झालेल्या कार्यक्रमात, एमसीसीआयचे महासंचालक प्रशांत गिरबाने यांनी एनएफएआयचे संचालक प्रकाश मगदुम यांच्याकडे रिळ हस्तांतरीत केली. 1200 ft असलेले दुर्मिळ छायाचित्रण 35 मिनिटांचे असून त्याला ऐतिहासिक मूल्य आहे. एमसीसीआयच्या 1940 ते 1960 दरम्यानच्या प्रमुख घटनांचा यात संघटनात्मक इतिहास आहे. प्रामुख्याने कृष्ण-धवल असलेल्या छायाचित्रणाचा काही भाग रंगीत आहे. 

आमच्या कार्यालयातच हे छायाचित्रण मिळाले आणि आम्हाला वाटले ते एनएफएआयकडे हस्तांतरीत करावे. आम्ही एनएफएआयला या महत्त्वाच्या फुटेजचे डिजीटल स्वरुपात जतन करण्याची विनंती केली आहे, असे गिरबाने याप्रसंगी म्हणाले.  

एनएफएआयचे संचालक प्रकाश मगदुम याप्रसंगी म्हणाले, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्रीज अँड ॲग्रीकल्चरकडून हे फुटेज मिळाले याचा आम्हाला आनंद आहे. सदर फुटेज चांगल्या स्थितीत असून आम्ही याला डिजीटल बनवण्याचे प्रयत्न करु. शहराच्या पायाभूत सुविधांचा आणि औद्योगिक वाढीचा विकास दर्शविल्यामुळे हे जतन करण्याजोगे छायाचित्रण आहे. 

या फुटेजचे प्रमुख वैशिष्ट्ये म्हणजे यात रौप्य महोत्सवी वर्ष सोहळा, पुणे येथील टिळक रस्त्यावरील एमसीसीआयच्या इमारतीचे उद्घाटन, एमसीसीआयचे मासिक संपदा (1947 मध्ये याची सुरुवात झाली होती), परीषदा आणि चर्चा-सभा, यात शंतनुराव किर्लोस्कर यांचा सत्कारसोहळा, आणि इतर विविध घटना यात आहेत. विशेष म्हणजे, थोर स्वातंत्र्यसेनानी आणि नेते सी. राजगोपालाचारी हे एका कार्यक्रमात सहभागी झालेले दिसतात. तसेच यात बँक ऑफ महाराष्ट्र आणि पुणे विभाग उत्पादकता परिषद आणि पुण्याचा औद्योगिक विकास आणि एमसीसीआयचे प्रयत्न याविषयीचे छायात्रिण यात पाहायला मिळते.

प्रकाश मगदुम यांनी एमसीसीआयएला अशी विनंती केली की शहरातील जुन्या औद्योगिक संस्थांकडून अशी दुर्मिळ फुटेज आणि चित्रपट मिळावेत यासाठी मदत करावी.

***

S.Thakur/P.Kor

*** 

सोशल मिडियावर आम्हाला फॉलो करा: @PIBMumbai   Image result for facebook icon /PIBMumbai    /pibmumbai  pibmumbai[at]gmail[dot]com



(Release ID: 1679861) Visitor Counter : 114


Read this release in: English